बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी चीन काहीही करण्यास तयार आहे. कोरोना वायरसमुळे आतापर्यंत 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सुमारे 40,171 लोकांना वायरसची लागण झाली आहे, तर 187,518 लोक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. यामध्ये असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात चिनी अधिकारी कोरोना वायरस झालेल्या रुग्णांशी गैरवर्तन करीत असल्याचे दिसून येत आहे.
एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोरोना वायरसचा संशयित महिला रुग्णाला एका डब्ब्यामध्ये बंद ठेवून ट्रकमध्ये ठेवण्यात आले आहे. डब्ब्यामध्ये लॉक केल्यानंतर ती महिला जोरजोरात ओरडतानाचा तिचा आवाज ऐकू येत आहे.
महिलेच्या सोबत असलेला तिचा पार्टनर तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत आहे पण डब्ब्यामध्ये लॉक केल्यानंतर ती स्त्री जोरजोरात ओरडू लागते. चिनी प्रशासन संक्रमित लोकांना स्वतंत्र ठिकाणी ठेवत आहे जेणेकरून इतरांमध्ये हा संसर्ग पसरू नये.
दुसर्या व्हिडिओमध्ये चिनी पोलिसांनी कोरोना वायरस लागण झालेल्या संशयितांना जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतले आहे. एका महिलेला तर तिच्या गाडीतून जबरदस्तीने खेचले गेले आहे. आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकांना घराबाहेर ओढले जात आहे. यावेळी बरेच लोक प्रचंड प्रतिकार करताना दिसत आहे.
या व्हिडिओ लीकमुळे काही लोक असा निष्कर्ष काढत आहेत की चिनी अधिकारी जगातील कोरोना वायरसला लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिनी प्रशासनाने वुहानचे व्हायरस सेंटरही पूर्णपणे बंद केले आहे. वुहान शहरात खूप शांतता पसरली आहे.