पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्ष आपआपल्या उमेदवाराचा प्रचार जोरदार करीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप आणि आरपीआय या महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरीचे शिवसेना आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी त्यांच्या मतदार संघामध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.
त्यांनी पदयात्रेद्वारे घरोघरी जात लांडेवाडी.फुलेनगर. विठ्ठलनगर भागात पायी फिरून घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत जनतेच्या प्रश्न व समस्य जाणून घेतल्या तसेच शिवसेना महिला संघटिका ॲड उर्मिला काळभोर संजय गांधी योजना समितीचे पिंपरी अध्यक्ष नितीन घोलप.युवासेना प्रमुख अभिजीत गोफण तसेच स्थानिक सेनेचे शाखा प्रमुख व कार्यकर्ते मोठया संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी गेल्या पाच ५ वर्षात केलेल्या विविध कामाची माहिती त्यांनी जनतेपर्यंत पोचली. तसेच सोडवलेल्या प्रश्नांची माहिती आमदारांनी नागरिकांना दिली.