मेष
दिवस मध्यम फलदायक आहे. संततीकडून निराशाजनक वार्ता समजेल. सायंकाळी रखडलेले काम मार्गी लागेल. रात्रीचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात घालवाल, ज्यामध्ये महत्वाची माहिती मिळू शकते. व्यापारात कटुता मधुरतेत बदलण्याची कला शिका, यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य, सान्निध्य लाभेल.
वृषभ
दिवस आनंदाचा आणि शांततेचा आहे. प्रत्येक कामात समाधान लाभेल. राजकीय क्षेत्रात प्रयत्नांना भरपूर यश मिळेल. संततीच्या भविष्याबाबतची चिंता दूर होईल. रात्री नावडती व्यक्ती समोर आल्याने त्रास सहन करावा लागेल, सावध रहा. नवीन कराराद्वारे पद आणि प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन
दिवस संमिश्र परिणामाचा आहे. मौल्यवान वस्तु हरवणे किंवा चोरीला जाण्याची भीती आहे, सावध रहा. नवीन लोकांच्या भेटी होतील. सायंकाळी आई-वडिलांची सेवा कराल. संततीला यश मिळाल्याने आनंद होईल. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील.
कर्क
दिवस उत्तम यशदायक आहे. उपजिविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल. मान, प्रतिष्ठे वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. सरकारी नोकरीत प्रमोशन मिळू शकते. जोडीदाराला सायंकाळी भेट देऊ शकता.
सिंह
दिवस प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारा आहे. व्यापारात उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. संततीच्या शिक्षणासंबंधी धावपळ करावी लागेल, यामुळे सायंकाळी थकवा जाणवेल, नेत्रविकाराची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होईल. वाणीतील सौम्यता मान-सन्मान देईल. रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या
दिवस संमिश्र आहे. नोकरी किंवा व्यापारातील प्रयत्नांना यश मिळेल. मालमत्तेच्या कायदेशीर वादात विजय होईल. व्यापारासाठी वडिलांचा सल्ला आवश्यक ठरेल. ज्याद्वारे व्यापारात काही नवीन आयडिया पुढे आणू शकता.
तुळ
चारही बाजूचे वातावरण सुखकारक राहील. शुभ माहिती मिळेल. प्रगती होईल. व्यापारातील मोठ्या व्यवहाराची समस्या मार्गी लागेल. प्रवासाचा बेत प्रबळ होऊन स्थगित होईल. कुटुंबात आनंद वाढेल. त्यांच्या महत्वाकांक्षा सहज पूर्ण कराल. योग्य प्रमाणात पैसा हातात आल्याने आनंद होईल. आर्थिक स्थितीची चिंता राहणार नाही.
वृश्चिक
दिवस परोपकारात जाईल. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात भाग घ्याल. लोक समर्थन देतील. मित्रांची संख्या वाढेल. काही शत्रु सुद्धा उत्पन्न होऊ शकतात, सतर्क रहा. काही शारीरिक समस्या असेल तर, त्रास होऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत सायंकाळी मजामस्ती कराल.
धनु
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कुटुंबाच्या गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे खर्च करावे लागतील. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. व्यापारात लाभ होईल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. प्रेमजीवनात थोडा तणाव असू शकतो, यासाठी जोडीदाराचे ऐका, समजून घ्या. संपत्तीचा वाद समाप्त होईल.
मकर
आर्थिक बाबतीत दिवस यश देणारा आहे. उपजिविकेच्या क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. सायंकाळी कोणत्याही वादात पडू नका, वाद कायदेशीर होऊ शकतो. नोकरीत अधिकार्यांच्या कृपेने प्रमोशन मिळू शकते. वडीलांच्या आरोग्यात घसरण होऊ शकते. सतर्क रहा, बाहेरचे खाणे टाळा.
कुंभ
दिवस त्रासदायक आहे. आरोग्यात घसरण होऊ शकते, सावध रहा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजार वाढू शकतो. काही विपरीत बातमी समजल्याने अचानक प्रवासाला जावे लागेल. कुणाशी वाद झाला तर सावध रहा. बुद्धीने केलेली कामे नुकसार करू शकतात. व्यापारातील अडचणींवर सायंकाळी कुटुंबियांशी चर्चा कराल.
मीन
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. संततीच्या भविष्याची चिंता राहील, त्याच्या विवाहासाठी धावपळ करावी लागेल. मेहुण्याशी व्यवहार करताना विचारपूर्वक करा. नाते बिघडू शकते. प्रिय वस्तु चोरीला जाऊ शकते, सावध रहा. दाम्पत्य जीवनातील अडथळा दूर होईल. सायंकाळी जोडीदाराशी महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.