मेष
आजचा दिवस महत्वकांक्षा पूर्ण करण्याचा आहे. एखादे काम पूर्ण करण्यासाठी छोटा प्रवास करावा लागेल. यातून यश मिळू शकते. यामुळे मन आनंदी होईल. नोकरीत अधिकार्याशी वाद होऊ शकतो, परंतु वाणीवर नियंत्रण ठेवा. दाम्पत्य जीवन सुखमय राहील.
वृष
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. सावधगिरीने काम करा. कोणतीही डील फायनल करताना अनेकदा विचार करा, अन्यथा भविष्यात नुकसान होऊ शकते. रात्री मित्रांसोबत मजामस्ती कराल, फिरायला जाल. बहिणीच्या विवाहातील अडचणी दूर होतील.
मिथुन
आजच्या दिवशी काही खास घडणार आहे. व्यापारात काही नवीन करण्याचा विचार कराल. यात लाभ आवश्य होईल. संततीकडून पूर्ण सुख आणि सहकार्य मिळेल. कर्ज फेडण्यात थोडे यश मिळेल. कामाबाबत नवीन प्लॅनिंग कराल. काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. विरूद्ध लिंगी मित्राशी संबंध बिघडतील, यासाठी बोलताना विचार करा.
कर्क
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कामे होत जातील. आज तीच कामे करा जी तुम्हाला आवडतात. सायंकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ आध्यात्मिक आणि धार्मिक कामात घालवाल, मनाला समाधान मिळेल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होईल आणि एखादे काम झाल्याने आनंद होईल. सहकार्यांसोबत संबंध दृढ होतील. धर्मासाठी पैसे खर्च कराल, पण आर्थिक संकट येणार नाही याची काळजी घ्या.
सिंह
आजचा दिवस व्यापारात नवीन संधी घेऊन आला आहे. ज्यांचा भविष्यात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. भविष्याची चिंता कमी होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात पैशाची कमतरता भासेल. पुरुषार्थ आणि आत्मविश्वास वाढेल. सायंकाळी सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. मान सन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात मित्रांच्या सहकार्याने अनुकूलता प्राप्त होईल. बुद्धी आणि विवेकाने निर्णय घेतल्यास यश मिळेल.
कन्या
आजचा दिवस सामान्य आहे. कुटुंबातील लोकांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. एखादे होत असलेले काम बिघडू शकते, परंतु कोणतेही पाऊल उचलताना काळजी घ्या. विनाकारण शत्रु उत्पन्न होऊ शकतात, परंतु ते काहीही करू शकणार नाही. अर्थव्यवस्था सुदृढ होईल आणि पैसा मिळवू शकाल. वाहनसुख मिळेल. जोडीदारा एखाद्या आजाराने त्रस्त होईल.
तुळ
आजचा दिवस संमिश्र आहे. कर्ज घेण्याचा विचार असेल तर सहज मिळेल. राजकीय स्पर्धेत विजय मिळेल. कामे सुद्धा पूर्ण होतील. सायंकाळपासून रात्रीपर्यंत मंगलसोहळ्यात सहभागी व्हाल, मन आनंदीत होईल. नोकरी करणार्या जातकांच्या अधिकारात वाढ होईल. अधिकारी युश होतील. सायंकाळी वादविवादात पडू नका. हा वाद कायदेशीर होऊ शकतो.
वृश्चिक
आजचा दिवस काही वेगळ्या प्रकारचे लाभ देणारा आहे. सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिले होते, ते आज परत मिळू शकतात. व्यापारात सुद्धा जास्त नफा होईल. बिझनेससाठी आज प्रवास करावा लागेल. यातून यश मिळेल. अचानक एखाद्या महान अधिकारी किंवा नेत्याची भेट होऊ शकते. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी कराल. संततीच्या विवाहातील अडथळे दूर होतील.
धनु
आजचा दिवस प्रगतीचा आहे. ज्ञानात वाढ होईल. कामातील अडचणी दूर होतील. भाऊ-बहिणीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सायंकाळी एखाद्या चर्चेत भाग घ्याल. नव्या व्यापारासाठी नवनवीन योजना बनवाल आणि त्यामध्ये यश मिळेल. वडीलांच्या आरोग्याबाबत सावध रहा. सायंकाळी कुटुंबातील लहान मुलांसोबत मजामस्ती कराल.
मकर
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. धाडसात वाढ होईल. महती सर्वत्र पसरेल. शत्रु नष्ट होतील. व्यापरात कोणत्याही व्यवहारात सावध रहा, अन्यथा पैसे अडकू शकतात. रूसलेल्या जोडीदाराला समजावण्याचा भरपूर प्रयत्न कराल. संततीच्या भविष्याची चिंता वाटेल. नोकरीत नवीन संधी मिळतील.
कुंभ
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. जुनी आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. पण आळस दूर सारा. तरच हे शक्य आहे. तुमचे म्हणणे दुसर्यांना खरे असल्याचे सांगण्यात यशस्वी हाल. सायंकाळी एखाद्या सोहळ्यात सहभागी व्हाल. मनात चांगली भावना असेल. कुटुंबात थोडा विरोध होऊ शकतो, ज्यामुळे तणाव येईल.
मीन
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. संततीकडून आनंददायक वार्ता ऐकायला मिळेल. व्यापारासाठी दिवस चांगला आहे. धनलाभ सुद्धा जास्त होईल, परंतु आरोग्यात एखादा आजार त्रास देऊ शकतो. यासाठी काळजी घ्या. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी गुरुंची सेवा करून गुप्त विद्या ग्रहण करतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नवीन व्यापारात यश मिळेल.