मेष
दिवस संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. घरात जास्त वेळ घालवा. कौटुंबिक तणाव त्रास देऊ शकतो, परंतु अस्वस्थ होऊ नका, कारण याचे कारण छोटे आहे. वडीलांच्या सल्ल्याने ही समस्या संपवू शकता. स्वतासाठी खरेदी करू शकता.
वृषभ
दिवस व्यस्ततेचा आहे. व्यापारासाठी सरकारकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. लाभ होईल. शेयर मार्केट इत्यादीतील गुंतवणुकीत भरपूर लाभ मिळेल. संततीचे कार्य पाहून आनंदी व्हाल. सायंकाळी शेजार्यांशी वाद होऊ शकतो, त्यापासून दूर रहा, कायदेशीर होऊ शकतो.
मिथुन
दिवस उत्साहाचा आहे. काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल. मात्र जुन्या कामाकडे लक्ष ठेवा. दुपारी फोनद्वारे शुभवार्ता ऐकायला मिळेल. बिझनेसमध्ये नवीन तंत्र अवलंबाल, ज्यामुळे लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. सायंकाळी आई-वडीलांना घेऊन छोटा प्रवास कराल.
कर्क
दिवस काहीसा खास ठरू शकतो. कारण आज जोडीदार तुमच्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन करू शकतो. व्यापारात जोखीम घेऊ नका, नुकसान होऊ शकते. कुटुंबातील वाद समाप्त होईल. कुटुंबात प्रेम दिसून येईल. सायंकाळी मित्रांसोबत मजामस्ती कराल. त्यांच्याकडून महत्वाची माहिती मिळू शकते.
सिंह
दिवस उत्तम फलदायक आहे. बिझनेससाठी नवीन कल्पना मनात येईल, ती अंमलात आणा, लाभ होईल. कुटुंबातील सदस्याशी मतभेद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. नातेवाईक, आप्तांशी काही नाराजी असेल तर ती आज दूर करा. मित्राकडून लाभ होईल.
कन्या
दिवस खुप व्यस्ततेत जाईल. बर्याच दिवसांपासूनचा तणाव दूर होईल. व्यापारात ईमानदारीने काम करा. लाभ होईल. गरजूला मदत करा, तुमच्या मदतीसाठी सुद्धा भविष्यात कुणीतरी पुढे येईल. बुद्धीने केलेल्या कामातून भरपूर लाभ मिळेल. प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल.
तुळ
प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारा दिवस आहे. शुभ माहिती मिळू शकते. रखडलेली डील पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत सावध रहा. आरोग्य नरम राहील. जोडीदाराच्या सोबत वेळ चांगला जाईल. घरचा खर्च वाढू शकतो. कुणाशी व्यवहार करताना विचारपूर्वक करा.
वृश्चिक
संमिश्र दिवस आहे. फिरायला जाण्याची संधी मिळेल. सायंकाळी मंगलकार्यात सहभागी होऊ शकता. चांगल्या व्यक्तींची भेट होईल. महत्वाच्या कामाची चिंता दूर होईल. रोजगाराची संधी मिळेल. प्रमोश मिळू शकते.
धनु
दिवस उत्तम फलदायक आहे. कर्ज घेण्यासाठी उत्तम दिवस आहे, सहज मिळेल. इच्छा नसतानाही काही खर्च करावे लागतील. बचतीकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरकडून मान सन्मान मिळेल. प्रवासाला गेला तर एखादे महत्वाचे काम होऊ शकते. यातून सर्वांचा फायदा होईल.
मकर
कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होऊ शकतो. कुणालाही उधार देताना विचार करून द्या. कामात स्थिती चांगली राहील. व्यापरात लाभ होईल. संततीच्या शिक्षणासाठी प्रवास करावा लागू शकतो. आज भरपूर कामे आहेत पण कोणते पहिले करायचे ते ठरवा.
कुंभ
दिवस मिळून काम करण्याचा आहे. नोकरीत टीम वर्कद्वारे काम करण्याने फायदा होईल. बिझनेसमध्ये एखादा वाद असेल तर संपेल. मित्रासाठी भेटवस्तू खरेदी कराल. सायंकाळी आई-वडीलांच्या सेवेत घालवाल. विद्यार्थ्याना शिक्षणासाठी पैसे खर्च करावे लागतील. आरोग्य थोडे नरम होऊ शकते. सतर्क रहा.
मीन
दिवस मध्यम आहे. प्रयत्न केल्यास रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. नोकरीत सतर्क रहा, कारण शत्रु त्रास देऊ शकतात. बाहेर मित्रांसोबत अनावश्यक खर्च करण्याऐजवी कुटुंबात वेळ घालवा भागीदारीतील व्यापारासाठी दिवस चांगला आहे.