मेष
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. व्यापारात विनाकारण अडचण आल्याने पैशांचे मार्ग प्रभावित होतील. मेहनत केली तरच विद्यार्थ्यांना यश मिळेल. अनोळखी लोकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे लाभ होईल. घरात किंवा व्यापारात बांधकामाची आवश्यकता भासेल. व्यापारात शुभवार्ता समजेल. नोकरीत प्रगती होईल, पण शत्रुंपासून सावध रहा.
वृषभ
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कुणाचेही मन दुखावून पैसे कमवू नका. एखाद्या कामात यश मिळाल्याने आनंद होईल. जुन्या मित्रांची भेट होईल. महत्वाची माहिती मिळेल. भावाशी सायंकाळी चर्चा कराल. संततीचे कार्य पाहून मन आनंदी होईल.
मिथुन
विषम परिस्थिती निर्माण होतील. कुटुंबात वादामुळे त्रस्त व्हाल, तणाव जाणवेल. सासरकडील व्यक्तीला पैसे देताना विचारपूर्वक द्या. कारण परत येण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबात चुकीचा निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रात केलेल्या कामाला विरोध होऊ शकतो, सावध रहा. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल. रखडलेली कामे पूर्ण करा.
कर्क
दिवस संमिश्र आहे. जास्त मेहनत करूनही अपेक्षित लाभ न मिळाल्याने त्रस्त दिसाल. तणाव राहील. सुख-दुख भाग्यावर सोडा. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल, सावध रहा. आवडती वसतू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. सायंकाळ कुटुंबासोबत घालवाल.
सिंह
दिवस उत्तम फलदायक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांची मागणी पूर्ण कराल. व्यापारात लाभ होईल. भाग्याची साथ मिळेल. सर्व कामे सहज आणि वेळेवर पूर्ण कराल. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. मित्राच्या मदतीसाठी पैसे खर्च कराल.
कन्या
सन्मान प्राप्तीचा दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीची काळजी वाटेल. समस्या समाप्त होतील. शुभवार्ता मिळत राहतील. यासाठी तीच कामे करा जी पूर्ण होऊ शकतात. दाम्पत्य जीवन सुखी राहील. सायंकाळचा वेळ कुटुंबियांसोबत घालवाल.
तुळ
ठोस परिणामांचा दिवस आहे. कार्यक्षेत्रात वलय राहील, कामे होत जातील. वेळेच्या सोबत चालल्यास प्रगती होईल. एखादा रोग त्रास देऊ शकतो, आज त्याचा त्रास वाढेल. सायंकाळी आईशी मतभेद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. मोठ्यांचे ऐका.
वृश्चिक
दिवस व्यस्तता आणि धावपळीचा आहे. दाम्पत्य जीवनातील सुख वाढेल. शेजार्यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु त्यांच्याशी मधुर संबंध ठेवा. मानसिक त्रासमुळे डोकेदुखीची समस्या त्रास देऊ शकते. विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील. संततीच्या शिक्षणासाठी धावपळ करावी लागेल, यश मिळेल.
धनु
ठोस परिणामांचा दिवस आहे. वाहनाची समस्या त्रास देऊ शकते, यासाठी प्रवास टाळा. पैसा हातात असूनही कुटुंबात अशांतता त्रास देऊ शकते, कारण वातावरण तणावाचे असेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. सरकारी नोकरीत प्रमोशन मिळू शकते. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील.
मकर
धाडस आणि पराक्रम राहील. संपत्ती खरेदी करताना सर्व बाजू तपासून घ्या. कुटुंबाच्या समस्या सोडवण्यात व्यस्त रहाल. व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्या. यश मिळेल आणि मित्रांचा विरोध कमी होईल. उत्तम रोजगाराची संधी मिळेल. प्रेमजीवन प्रिय व्यक्तीची कुटुंबाशी भेट घडवून आणून शकता.
कुंभ
आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. थोडे त्रस्त राहाल. सायंकाळी जुन्या मित्राचे आगमन होईल. विनाकारण तर्क-वितर्क केल्याने वेळ आणि पैशाची हानी होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरकडील संबंध सुधारतील. कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. परतफेड होणार नाही.
मीन
दिवस उत्तम लाभदायक आहे. व्यापारात काही नवीन प्रयोग करून पैसे कमावू शकता, तसेच बदल करू शकता. आरोग्याच्या बाबतीत सावाध रहा, काही त्रास होऊ शकतो. गुंतागुंत संपेल आणि विरोधक शांत होतील. जोडीदारापासून आर्थिक कारणासाठी दूर रहाल, मात्र प्रेम कायम राहील. अडकलेले पैसे मिळतील.