मेष
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. आजचा दिवस व्यापार्यांसाठी लाभदायक आहे. नोकरीत सतर्क रहा, शत्रु त्रास देऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यापारात अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा लागेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. वडीलांशी कौटुंबिक विषयावर चर्चा कराल.
वृषभ
संमिश्र दिवस आहे. महत्वाची गोष्ट खरेदी करण्याची इच्छा होईल, पण बजेटमुळे विचार बदलाल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. नोकरीत महिला सहकार्यांशी ताळमेळ ठेवल्यास फायदा होईल. संपत्ती खरेदीसाठी दिवस चांगला. जोडीदारासोबत संततीच्या भविष्याची चर्चा करा.
मिथुन
दिवस गोंधळाचा आहे. व्यापारात चांगले काम हातात येईल, व्यस्तता वाढेल. व्यापारासाठी कर्ज सहजपणे मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. यामुळे अनेक लाभ होऊ शकतात. राजकीय क्षेत्रात सुद्धा तुमची रुची वाढेल.
कर्क
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. बिझनेससाठी मोठा भाऊ-बहिणीचा सल्ला घेऊ शकता. घरातील वादावर विचार कराल. नोकरीत काम सुरळीत राहील, याकडे लक्ष ठेवा, तरच प्रगती होईल. जोखमीच्या कामात हात टाकल्यास भरपूर लाभ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी उत्तम दिवस आहे.
सिंह
शुभ परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात जबाबदारीचा दबाव राहील, अधिकारी आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल, दबाव जाणवेल, काम वेळेत पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत दिवस संमिश्र आहे. दूरचा प्रवास टाळा, आरोग्यात घसरण होऊ शकते. नवीन काम टाळा, दिवस चांगला नाही. सायंकाळी छोट्या मुलांसह मजामस्ती कराल.
कन्या
विकासासाठी अनुकूल दिवस आहे. संततीच्या शिक्षणाची चिंता राहील. जोडीदाराच्या सहकार्याने सायंकाळपर्यत ही समस्या मार्गी लागेल. कार्यक्षेत्रात स्थिती सामान्य राहील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. मार्केटिंग आणि सेल्सच्या क्षेत्रात टार्गेटचा दबाव राहील. घरगुती वस्तू खरेदी कराल. स्वतासाठी पैसे खर्च कराल.
तुळ
दिवस संमिश्र आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. बहिण-भावाच्या सहकार्याने बिझनेसची प्रगती होईल. आर्थिक विषयाची चिंता राहील. जोखमीची कामे टाळा, नुकसान होऊ शकते. व्यापारासाठी छोटा प्रवास लाभदायक राहील. भावाच्या विवाहातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक
दिवस प्रगतीचा आहे. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम. कौटुंबिक ताळमेळ राहील. घराच्या बांधकामाची कामे कराल. प्रेमसंबंधात तणाव असू शकते. जोडीदाराशी वाद होईल. संततीच्या विवाहातील अडचणी दूर होतील. आईच्या आरोग्याबाबत सतर्क रहा, त्यांना एखादा आजार त्रास देऊ शकतो.
धनु
दिवस प्रगतीचा आहे. कार्यक्षेत्रात तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाचा लाभ होईल. नोकरीत मैत्रिणीच्या सहकार्याने लाभ होईल. अधिकार्यांशी गोड बोला, अन्यथा कामे बिघडू शकतात. संपत्तीत वाढ होईल. घरच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल.
मकर
दिवस संमिश्र फलदायक आहे. कार्यक्षेत्रात नवीन प्रयत्न कराल, लाभ मिळेल. कुटुंबातील वादावर विचार कराल. संततीच्या तब्येतीची काळजी राहील. सासरकडून धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल.
कुंभ
चढ-उताराचा दिवस आहे. व्यापारात निर्णय घेताना घाई करू नका, नंतर पश्चाताप होईल. आरोग्याच्या बाबतीत सावध रहा, घसरण होऊ शकते. बरेच दिवसांपासून एखादा रोग त्रास देत असेल तर आज त्याच्यात वाढ होऊ शकते. ओळखीच्या व्यक्तीकडून शुभवार्ता समजू शकते. संततीबाबत महत्वाचा निर्णय घ्याल.
मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. कौटुंबिक व्यापारात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्वाचे काम झाल्याने आनंद होईल. पार्टी कराल. सायंकाळी मंगल सोहळ्यात सहभागी व्हाल. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मेहनत केली तरच विद्यार्थ्यांना यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.