बहुजननामा ऑनलाईन टीम –
मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. बिझनेसमध्ये भरपूर लाभ होईल. रखडलेल्या मालाची अचानक विक्री होईल. दाम्पत्य जीवनात प्रेम, विश्वास वाढेल. घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मित्राची मदत घ्याल. रोजगारात उत्तम संधी मिळेल. वाहन, घरासंबंधी समस्या पुन्हा त्रास देईल.
वृषभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. स्वयंरोजगारात भविष्याची चिंता सतावू शकते. मोठ्या अधिकार्याच्या मदतीने संपत्तीचा वाद मार्गी लागेल. सासरकडील बाजूत सुधारणा होईल. आर्थिक स्थिती तणावाची राहील.
मिथुन
दिवस संमिश्र आहे. पैशाची आवक चांगली होईल. सौदे पक्के होतील. मन थोडे उदासीन राहील. व्यवसायामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. ज्यामुळे आई नाराज होईल. दिवसाच्या सुरूवातीपासून व्यवसायाच्या कामात व्यस्त असाल. दैनदिन गरजांसाठी पैसे खर्च कराल. बचत होणार नाही.
कर्क
दिवस लाभदायक आहे. व्यापारात मेहनत करावी लागेल, तरच गुंतागुंत सुटेल. अतिउत्साह, जोश दाखवला तर काम बिघडेल. व्यापारात वडीलांच्या मार्गदर्शनाने लाभ होईल. परदेशात राहणार्या नातेवाईकांमुळे शुभवार्ता समजेल.
सिंह
दिवस संमिश्र आहे. व्यवसायात निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण निर्णयाचा विरोध होऊ शकतो. कुटुंबातील वादावर मार्ग निघेल. नात्यात दुरावा येऊ शकतो. कुटुंबातील खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहारात सावध रहा, नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना एकाग्रतेची आवश्यकता. प्रेमजीवन आनंदी राहील.
कन्या
काही समस्या जाणवतील. एखाद्या सदस्यामुळे समााजिक सन्मान कमी होण्याची शक्यता आहे. निराशा होईल. आज आवश्यकतेनुसार पैसे मिळतील. सायंकाळी कुटुंबाची मागणी पूर्ण कराल. रखडलेले काम पूर्ण होईल. संततीला एखादी शारीरीक समस्या त्रास देऊ शकते.
तुळ
धावपळ होईल. कार्यक्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल. जास्ती मेहनतीमुळे कमी वेळात जास्त लाभ होईल. आळस सोडावा लागेल. व्यवसायात अनेक अनुभव येतील. घरातील अर्धवट कामे पूर्ण करावी लागतील. संततीच्या विवाहातील अडथळा दूर होईल.
वृश्चिक
वागण्यात जिद्दीपणा वाढेल, आपले म्हणणे पटवूनच गप्प बसाल. मात्र, राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. नाती बिघडू शकतात. व्यवसायात परदेश किंवा बाहेरील कामातून लाभ होऊ शकतो. मित्रांसोबत मजामस्तीसाठी पैसे खर्च कराल.
धनु
दिवस संमिश्र आहे. घरात एखाद्या नवीन वस्तुची खरेदी केल्याने एखाद्या ज्येष्ठाशी मतभेद होतील. प्रवास टाळा, कारण आवडती वस्तू चोरीस जाण्याची शक्यता आहे, आरोग्य सुद्धा कमजोर राहू शकते. कार्यक्षेत्रात कामे मार्गी लागतील. सायंकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. मित्र, भावांमुळे घरात भांडण होऊ शकते.
मकर
परदेशाशी व्यापारात लाभ होईल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. कौटुंबिक संपत्तीचे प्रकरण मार्गी लागेल. कार्यक्षेत्रात कठीण कामे मार्गी लागतील. लाभदायक उपक्रम सुरू कराल. सामाजिक क्षेत्रात व्यक्तिमत्व उजळेल. सायंकाळी कुटुंबातील लहान मुलांसोबत मजामस्ती कराल.
कुंभ
दिवस ठोस परिणामांचा आहे. नोकरीत दिवस आनंदी राहील. अर्धवट काम पूर्ण केल्यानंतर कामात मन लागणार नाही. वडीलांच्या तब्येतीत घसरण होऊ शकते, सतर्क रहा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सायंकाळी जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता.
मीन
महत्वकांक्षांच्या पूर्ततेचा दिवस आहे. घरात बांधकामाची आवश्यकता भासेल, यासाठी पैसे खर्च कराल. उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवा. व्यापारात नवीन दुकान किंवा योजनेची सुरूवात कराल. कार्यक्षेत्रात जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. प्रेमजीवनात सन्मान वाढेल.