मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. दाम्पत्य जीवनात सुख आणि शांती राहील. बिजनेस मध्ये भरपूर लाभ होईल. आर्थिक स्थितीची चिंता कमी होईल. भागीदारीच्या व्यापारात लाभ होईल. सायंकाळी कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. मान सन्मान वाढेल. नवीन कामात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. लव्ह लाईफमध्ये नवीन्य येईल. कार्यक्षेत्रात समस्या जाणवेल, परंतु काही काळानंतर दूर होईल. भावाच्या सहाकार्याने प्रगती होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. मानसिक तणाव जाणवेल. वडीलांच्या तब्येतीबाबत सावध रहा.
मिथुन
सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. सन्मान मिळेल. व्यस्ततेमुळे प्रेमसंबंधात अंतर पडेल. व्यक्तिगत जीवनावर विचार कराल. अचानक प्रवास करावा लागू शकतो. आवश्यक कागद आणि दागिने सांभाळा, चोरी होण्याची भीती आहे.
कर्क
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. सर्व कामे निर्विघ्न पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसाय स्थळावर आज परिस्थिती अनुकूल राहील. कोणतेही काम विचारपूर्वक करा, यश मिळेल. कौटुंबिक संपती मिळेल. कुटुंबासह स्वताच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. प्रवासाला जाताना विचार करून जा.
सिंह
चिंता राहील. संततीच्या भविष्याची चिंता सतावू शकते. भावनिक होऊन मनातील गोष्टी कुणालाही सांगू नका, नंतर त्रास होऊ शकतो, ज्याचा परिणाम व्यापर आणि प्रगतीवर होईल. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सासरकडून धनलाभ होईल. नवीन व्यवसायाठी दिवस चांगला आहे. व्यापारात प्रवास करावा लागेल. त्रास होऊ शकतो.
कन्या
दिवस उत्तम फलदायक आहे. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. नातेवाईकाला विचारपूर्वक उसने पैसे द्या, संबंध बिघडू शकतात. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. घरात शुभकार्य होऊ शकते. व्यापारात नवीन प्रयोग कराल, कुटुंबाची साथ मिळेल.
तुळ
दिवस व्यस्ततेचा आहे. मित्रांच्या मदतीने काम पूर्ण होईल. खर्च आणि उत्पन्न बरोबरीत असेल. आरोग्याच्या बाबतीत महत्वाची पावले उचलण्याची गरज आहे. एखादा रोग त्रास देऊ शकतो, डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्या. विद्यार्थ्यांना शुभवार्ता समजेल. आई-वडिलांकडून प्रेम मिळेल. गुंतवणूक करू शकता.
वृश्चिक
मजामस्तीचा मूड असेल. लक्ष आज काम सोडून मजामस्तीकडे लागेल. पण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. व्यापाराकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना भविष्यानुसार कौशल्य निवडावे लागेल. परोपकार कराल. अगोदर केलेल्या शुभकार्यातून शुभवार्ता समजेल. दुपारी एखादी नवीन डील फायनल होईल. चिंता कमी होईल.
धनु
संमिश्र दिवस आहे. दाम्पत्य जीवन ठिक करण्यासाठी मेहनत करावी लागेल. जोडीदार नाराज असेल. त्यास समजावण्याचा प्रयत्न करा. घरगुती तणाव सोडवण्यात वेळ जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने मन आनंदीत राहील. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठवा.
मकर
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर जास्त लक्ष ठेवावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळेल. पण मेहनत करावी लागेल. भाऊ-बहिणीशी संबंध सुधारतील. प्रेमसंबंधात भेटवस्तू मिळेल. सरकारी नोकरीत काही परिवर्तन होऊ शकते. व्यवसायात नवीन उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील.
कुंभ
दिवस आनंददायी आहे. स्वभावात चंचलता राहील. सर्वांशी प्रेमाने वागाल. लाभ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्ट-कचेरीचे प्रकरण तुमच्या बाजूने येईल. दुसर्यांना त्रास देण्यात आनंद मिळेल, परंतु कुणालाही नाराज होऊ देऊ नका.
मीन
दिवस फलदायक आहे. कार्यक्षेत्रात आळस करू नका. नुकसान होऊ शकते. कुटुंबासह स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्या, भविष्यात मोठा आजार त्रास देऊ शकतो. दुपारी उत्पन्न वाढेल. प्रगती होईल. नवीन व्यापर करण्याचा विचार कराल. दिवस उत्तम आहे. जोडीदाराला घेऊन फिरायला जाल.