मेष
आजचा दिवस यशदायक आहे. एका पाठोपाठ एक प्रत्येक कामात यश मिळेल, यामुळे तुमचे धैर्य सुद्धा उच्च असेल. परंतु संध्याकाळी आरोग्यामध्ये काही प्रमाणात घसरण होऊ शकते, म्हणूनच आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काही नवीन पुस्तके खरेदी करावी लागू शकतात. संततीच्या भविष्याबद्दल थोडे चिंताग्रस्त होऊ शकता. काही वेळ कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या सेवेत घालवाल.
वृषभ
आज अपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील. कारण दुसरा कोणताही उपाय असणार नाही. आळस सोडून द्यावी लागेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जर काही काळापासून जोडीदारासोबत वाद सुरू असेल तर तो आज संपेल. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सायंकाळी काही शत्रू प्रबळ असू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा.
मिथुन
आजचा दिवस धावपळीचा आहे. काहीजण संततीच्या करियरसाठी विशेष प्रकारे धावपळ करू शकतात. जे परदेशाशी व्यापार करतात त्यांना कदाचित परदेशातही जावे लागू शकते. स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा विचार कराल, परंतु ते शक्य होणार नाही. आज जोडीदाराला सौंदर्य प्रसाधनाची एखादी वस्तू भेट देऊ शकता. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल.
कर्क
आजचा दिवस कायद्याच्या कचाट्यात अडकण्याचा आहे. जर तुमचे एखादे कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर आज पुन्हा डोके वर काढेल. ज्यामुळे त्रास होऊ शकतो. पैसे सुद्धा कमी मिळतील. व्यवसायात पैशाची कमतरता भासू शकते. नोकरी आणि व्यवसायात गुंतलेल्या लोकांची प्रगती होईल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.
सिंह
आज कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी फिरायला जाण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील, परंतु पैसे जास्त खर्च होतील. मान, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. सासरच्या बाजूचे संबंध मजबूत होतील. मित्रांशी व्यवहार करणे टाळा, अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागेल. जोडीदार निर्णयामध्ये पूर्ण साथ देईल. बाहेर खाणे-पिणे टाळा.
कन्या
आज घरी एखादे नवीन सामान आणू शकता, ज्याची तुम्ही मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होतात. आज तो दिवस आला आहे. आर्थिक स्थितीव दृष्टी टाकलीत तर भविष्याबद्दल चिंता वाटेल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. भावाच्या सल्ल्याने व्यवसायाला नवजीवन मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडे चिंतीत असाल.
तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज कुणाचाही भानगडीत पडू नका, अन्यथा ती भानगड तुमच्या गळ्यात येऊ शकते, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. आज आईशी वाद होऊ शकतो, मात्र संयम ठेवा. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगला निकाल प्राप्त होईल. संध्याकाळ शेजारच्या लोकांसह मांगलमय कार्यक्रमात घालवाल.
वृश्चिक
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणार्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कारण त्यांना नवीन संधी मिळतील. कौटुंबिक व्यवसायासाठी एखाद्याच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल, परंतु सल्ला अशा व्यक्तीचा घ्या जो अनुभवी आहे. संततीला एखादी शारीरिक समस्या असू शकते, जी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अनेक दिवसांपासून मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होईल.
धनु
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. काहीही करून आर्थिक स्थितीत वाढ कराल, ज्यामुळे तुम्ही आणि कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल, लहान मुले आज एखादी मागणी करू शकतात. मुलगा किंवा मुलीच्या लग्नाच्या संबंधित एखादे प्रकरण आज पुन्हा चर्चेत येऊ शकते. जोडीदार बाहेर कुठेतरी फिरायला जाण्यासाठी बोलू शकतो. प्रेमसंबंध मजबूत होतील. अभ्यासात मित्रांचे सहकार्य मिळेल.
मकर
आज दैनंदिन गरजांच्या काही वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे खिशावर भार येऊ शकतो. रोजगारासाठी प्रयत्न करणार्यांना यश मिळेल. परदेशाशी व्यापार वाढेल. आज कुठे तरी अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे आनंद होईल. सासरच्या मंडळींशी वाद होऊ शकतो, म्हणून बोलण्यात संयम ठेवा.
कुंभ
आज संततीसाठी एखादी भेट आणू शकता, ज्यामुळे मान सन्मान वाढेल. सामाजिक, पद, प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत शत्रूंपासून सावध रहा, कारण ते नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल, त्याच्याशी बोलल्याने आनंद होईल. व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. आई-वडिलांच्या सेवेची संधी मिळेल.
मीन
जर भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आजचा सर्वोत्तम आहे. भविष्यात भरपूर साथ मिळेल. संततीच्या भविष्याबद्दलची चिंता आज संपेल. मुले धार्मिक कार्यात व्यस्त असल्याचे पाहून आनंद होईल. आज एखाद्या मित्राला मदत करू शकता. भावंडांच्या साथीची आवश्यकता असेल. जोडीदाराशी आईचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. परंतु निराश होऊ नका. संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल.