मेष
horoscope : दिवस संमिश्र आहे. त्रस्त होऊ शकतो. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल, भेट होईल. जोडीदाराची चांगली साथ आणि सान्निध्य मिळेल. नोकरीत, व्यवसायात आर्थिक लाभ थांबून-थांबून झाल्याने अनेक अडचणी येतील. दुपारी कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकते. आईसाठी भेटवस्तू खरेदी कराल.
वृषभ
आळस जाणवेल, ज्यामुळे सांधेदुखी, अंग जखडणे इत्यादी त्रास होईल. अस्वस्थ वाटेल. व्यवसायात चांगला पैसा मिळेल. नोकरीत आकस्मिक लाभ मिळेल. सायंकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. काम उशीरा केल्याने व्यापार मंदावेल. आर्थिक स्थिती कमजोर होईल. सायंकाळी मित्रासोबत मजामस्ती कराल.
मिथुन
दिवस संमिश्र फलदायक आहे. व्यापारात धनलाभ होऊ शकतो. व्यापारातील खर्च नियंत्रणात ठेवा. पैशाच्या व्यवहारात सावध रहा, नुकसान होऊ शकते. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. सायंकाळी मित्रांसोबत पार्टी कराल. त्रास वाढू शकतो.
कर्क
दिवस उत्तम फलदायक आहे. आई-वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या. धनप्राप्ती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना तयारीच्या चाचणीची संधी मिळेल. संततीचे चांगले कार्य पाहून विश्वास मजबूत होईल. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. व्यापारात नवीन संधी मिळतील.
सिंह
दिवस प्रगतीचे मार्ग खुले करेल. जे काम करण्याची इच्छा बाळगाल ते काम होईल. यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आई-वडीलांचे सहकार्य आणि आशीर्वादाने सर्व कामात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात तणाव असू शकतो. भाऊ-बहिणीसोबतचे बिघडलेले संबंध सुधारण्याची संधी मिळेल. कोणतेही काम पुढे ढकलू नका.
कन्या
प्रत्येक कामात सावध रहा. पैशाच्या पाठीमागे धावणे थांबवा, पैशाच्या लालसेने कशात तरी अडकू शकता. व्यावसायिक स्पर्धा प्रत्येक कामात व्यत्यय आणेल. कुटुंबियांशी किरकोळ गोष्टीवरून वाद होईल. सतर्क रहा, वाणी मधुर ठेवा. सासरकडून धनलाभ होईल. दुपारपर्यंत सर्व कामे पूर्ण करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
तुळ
दिवस उत्तम यशदायक आहे. सरकारी कामात यश मिळेल. प्रयत्न करत रहा. छोट्या-मोठ्या गोष्टी मनावर घेऊ नका, जोडीदाराशी वाद होऊ शकतो.अधिकारी वर्ग कामात मदत करेल. नोकरीत शत्रु त्रास देऊ शकतो, सतर्क रहा. वडीलांची तब्येत बिघडू शकते.
वृश्चिक
आजचा दिवस व्यस्तेचा, धावपळीचा आहे. व्यापारातील प्रयत्न यशस्वी होतील. मालमत्ता खरेदीसाठी दिवस उत्तम. भागीदारातील व्यवसाय लाभ देईल. भविष्यातील आर्थिक चिंता कमी होईल. परंतु खर्च आणि उत्पन्नात संतुलन ठेवा. व्यस्त असूनही घरासाठी वेळ काढाल.
धनु
विचार केलेल्या योजना यशस्वी होतील, परंतु नंतर विघ्न आल्याने हाती निराशा येऊ शकते. वडीलांच्या आशीर्वादाने योजनेला गती मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापारात भागीदारीत पैशावरून वाद होऊ शकतो. मधुर वाणीमुळे या समस्येतून बाहेर याल.
मकर
लाभाच्या संधी शोधण्यात दिवस व्यतीत होईल, अस्वस्थ होऊ नका संधी आवश्य मिळेल. संततीच्या शिक्षणासाठी प्रवास होईल, यश मिळेल. परदेशातील नातेवाईकांकडून शुभवार्ता समजेल. भाऊ किंवा बहिणीचा विवाह प्रस्ताव मंजूर होईल. कुटुंबात मंगलकार्यावर चर्चा होईल. शेजारच्यांशी वादात पडू नका.
कुंभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. व्यवसायाच्या योजनांमध्ये बदल करावा लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होईल. सासरच्या एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. ठोस निर्णय घेऊ न शकल्याने नुकसान होऊ शकते.
मीन
अनुकूल दिवस आहे. आरोग्य चांगले राहिल्याने मन लावून काम कराल, परंतु कुणाचा हस्तक्षेप झाल्यास विघ्न येऊ शकते. आपल्या इतरांसमोर आयडिया मांडू नका, ते तुम्हालाच लटकवू शकतात. सामाजिक कामात यश मिळेल, मित्रांची संख्या वाढेल. राजकीय क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. उधार घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा.