मेष
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. संततीबाबतची चिंता दूर होईल. कामानिमित्त दुपारपासून सायंकाळपर्यंत त्रास होईल. कौटुंबिक वाद संपेल. भाऊ-बहिणीच्या नात्यात मधुरता येईल. व्यापारासाठी प्रवास करू शकता, यातून भविष्यात लाभ होईल. सासरच्या बाजूकडून सन्मान मिळेल.
वृष
आजचा दिवस संमिश्र आहे. प्रिय व्यक्ती किंवा नातेवाईकांपैकी कुणाला तरी शारीरीक त्रास होऊ शकतो, त्यांना मदत करावी लागेल. प्रसिद्धी वाढेल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबासोबत प्रवासाला जाऊ शकता. अनावश्यक खर्च आणि वाद टाळा. वडीलांना काही आजार असेल तर तो आज त्रास देऊ शकतो.
मिथुन
आजचा दिवस प्रगतीचे नवे मार्ग उघडेल. अचानक हातात पैसा येईल, मनोबल उच्च होईल. प्रिय व्यक्तींसोबत वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. जोडीदारासाठी काही शॉपिंग कराल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. आज केलेल्या कामाचे फळ उशीरा मिळेल. सायंकाळी कुटुंबासह मंगलकार्यात सहभागी व्हाल.
कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन योजना लाभान्वित करेल. व्यवसाय नवे यशस्वी प्रयत्न कराल. मान व प्रतिष्ठा वाढेल. चांगल्या लोकांशी संबंध वाढतील. सायंकाळी पाहुण्यांचे आगमन होईल. खर्च जास्त होईल. सासरच्या बाजूकडे जी समस्या सुरू होती ती आज संपेल.
सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. दैनिक गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे खर्च कराल. व्यवसायातील समस्या भावाला सांगाल, ज्याचा लाभ मिळेल. नोकरीत पार्टटाइम कामासाठी वेळ काढाल. व्यापारात नवीन डिल मिळेल. सामाजिक समारंभागत सहभागी होऊ शकता.
कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कुटुंबातील कुणाची तरी समस्या त्रास देईल. संततीच्या भविष्याची चिंता असू शकते. व्यवसायात भरपूर लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त कराल. विचारपूर्वक खर्च करा. सासरकडून मानसन्मान मिळेल. सायंकाळी आईला एखादी भेट द्याल.
तुळ
आज मनासारखे परिणाम मिळतील. त्यामध्ये भरपूर यश मिळेल. नोकरीत मनासारखे काम मिळेल. मन प्रसन्न राहिल. वातावरण सुखद राहिल. अधिकारी कौतूक करतील. प्रॉपर्टी खरेदी करताना सर्व बाजू तपासून पहा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. नोकरी आणि व्यवसायात शत्रु वरचढ होऊ शकतो, सावध रहा. डोळे आणि कान उघडे ठेवा. आर्थिक लाभ भरपूर होईल. जास्त खर्चामुळे चिंता वाढेल. स्थान परिवर्तन होऊ शकते. संततीच्या विवाहाची चिंता सतावू शकते.
धनु
आजचा दिवस नव्या आशेची किरणे घेऊन येईल. शारीरिक व आर्थिक बळ मिळेल. सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील गरजा पूर्ण कराल. खर्च होईल. व्यापारासाठी कुणाच्यातरी सल्ल्याची आवश्यकता असेल. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने लाभ मिळेल. संततीला डोळ्याची समस्या होऊ शकते, सावध रहा.
मकर
आजचा दिवस निराशाजनक असू शकतो. भावबंधकीत व्यापारात नाराजी होऊ शकते. दुकान, घर खरेदी करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या. शत्रु विनाकारण त्रास देऊ शकतो. प्रगती त्यांना सहन होणार नाही. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष कमी लागेल. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल.
कुंभ
आज व्यवसायात लाभ होईल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. परेदशाशी व्यापारात शुभवार्ता समजेल. संततीच्या भविष्याची चिंता सतावू शकते. सासरच्या बाजूकडील एखाद्याशी वाद होऊ शकतो. जोडीदार तुमच्या बाजूने असेल. अडकलेले पैसे मित्राच्या मदतीने मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मीन
आज महत्वाकांक्षांची पूर्तता होईल. मानसिक तणाव टाळण्यासाठी धैर्य अणि नम्रता बाळगा. नोकरीत पदभार आणि अधिकारात वाढ होईल. थोडी त्रास होऊ शकतो. परंतु सायंकाळी मार्ग निघेल. अधिकारी खुश होतील. संपत्तीचा वाद असेल तर तो कायदेशीर होऊ शकतो. विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले होतील.