मेष
आजचा दिवस शारीरिकबाबतीत समस्या देऊ शकतो. गुप्त पध्दतींद्वारे पैसे मिळविण्यात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात वर्चस्व वाढेल. कुटुंबात शांतीचे वातावरण असेल, ज्यामुळे आराम मिळेल. प्रेमसंबंधात कठीण काळ पहावा लागेल. प्रयत्नांनंतरही ताळमेळ ठिक राहणार नाही. यास समजून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहित लोकांसाठी दिवस अनुकूल असेल. जोडीदाराकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल.
वृषभ
दिवसाची सुरुवात उत्तम होईल. व्यवसायात फायदा होईल. पार्टनरशी चांगल्या संबंधामुळे व्यवसायाला नवीन गती द्याल. दोघांचा निर्णय एखादे मोठे काम करेल. जोडीदारास कुटुंबातील सदस्यांकडून लाभ होईल, तुम्हाला अप्रत्यक्ष लाभ होईल. कामात चांगले परिणाम मिळतील, पण मेहनत करावी लागेल. मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्य ठीक राहील, पण सासुरवाडीत कुणाची तरी तब्येत बिघडू शकते. लव्ह लाइफ अनुकूल असेल. मनात ज्या गोष्टी चालू आहेत त्या प्रिय व्यक्तीला सांगणे आवश्यक आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो, तरीसुद्धा प्रेम दिसेल.
मिथुन
आज काही आव्हाने असतील ज्यांच्यावर मात करण्यासाठी मेहनत करावी लागेल. कामात मेहनत करावी लागेल, तरच चांगले परिणाम मिळतील. खर्च वाढेल. लव्ह लाइफमध्ये अनुकूल परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत आनंदी राहाल. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव राहील. परंतु नाते दृढ राहील. जोडीदारासोबत कौटुंबिक चर्चा होऊ शकते. आरोग्य थोडे कमजोर होईल. धार्मिक कार्य उत्साहाने कराल.
कर्क
आजचा दिवस अनुकूल आहे. उत्पन्न वाढेल. आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. ज्यातून लाभ होण्याचा मार्ग दिसेल. लव्ह लाइफमध्ये प्रिय व्यक्तीच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो, ज्याचे कारण तुमचे वागणे असेल. जास्त खर्चामुळे त्रास होऊ शकतो. गुप्तपणे आनंद घेण्याची इच्छा असेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदारास कार्यालयीन कामाच्या बाहेर जावे लागू शकते. ऑफिसमधील कामात टाळाटाळ कराल.
सिंह
आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचा समन्वय पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करेल. एखादी मालमत्ता घेऊ शकता. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्यही सुधारेल, ज्यामुळे आनंद होईल. कुटुंबातील एखाद्याबरोबर व्यवसाय करत असाल तर आज चांगले परिणाम मिळवाल. वैवाहिक जीवनातही आनंदी क्षण असतील आणि जोडीदारासोबत आनंदी राहाल. नोकरीत आज बॉसच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. कामाकडे लक्ष न दिल्यास असे होईल.
कन्या
आज काही आव्हाने असतील, ज्यातून बाहेर पडण्यासाठी धैर्य दाखवावे लागेल. त्रासातून मुक्त होण्याचा मार्ग सापडेल. कौटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जा. ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते म्हणून कौटुंबिक वातावरण थोडे अस्वस्थ असू शकते. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. जोडीदार कुटुंबाबद्दल विचार करेल आणि महत्त्वपूर्ण योगदान देईल. कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. पण तुमचे लक्ष कामापेक्षा उत्पन्न वाढविण्यावर असेल. व्यवसायात अनुकूल परिणाम मिळतील. लव्ह लाइफमध्ये आज थोडी मेहनत करावी लागेल. प्रिय व्यक्तीचा मूड पाहूनच बोला.
तुळ
आजचा दिवस खूप अनुकूल आहे. पैशाच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल. पैसा साठवण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्न वाढेल. मान सन्मान वाढेल. कुटुंबात तुमचा शब्द स्वीकारला जाईल. कौटुंबिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आज प्रवास टाळा. लव्ह लाइफसाठी दिवस अनुकूल आहे. वैवाहिक जीवनातील ताण कमी करण्यासाठी जोडीदाराशी स्पष्ट बोलावे लागते.
वृश्चिक
मानसिक ताण नियंत्रित करून अनेक आव्हानांमधून मार्ग काढाल. मानसिक ताणतणाव असाल तर आरोग्याबरोबरच कार्यक्षेत्रातही अडचणींना सामोरे जावे लागेल. जर स्वताला सांभाळलेत तर अनेक आर्थिकदृष्ट्या अनेक संधी मिळतील, ज्या पुढे जाण्यासाठी उपयोगी असतील. प्रॉपर्टीच्या व्यवहारात चांगले काम कराल आणि यातून पैसे मिळतील. आव्हानांवर विजय मिळविण्यात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक फायदाही होईल. दिनमान प्रेमसंबंधासाठ अधिक अनुकूल नाही. विवाहित लोक सुखी असतील. कामात कामगिरी चांगली होईल.
धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. मानसिक तणावातूनही मुक्ती मिळेल. काही खर्चही वाढेल. स्वत:ला श्रेष्ठ सिद्ध करण्याची इच्छा होईल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. कामासंबंधित प्रवास यशस्वी होईल. मेहनतीचे फळ मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराबरोबर तणाव वाढू देऊ नका.
मकर
आजचा दिवस चांगला जाईल. धनलाभ होईल. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. लव्ह लाईफमध्ये चांगले परिणाम मिळतील. थोडी नाराजी असूनही प्रिय व्यक्ती तुमच्याबरोबर राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. बॉसचे मन वळविण्यात यशस्वी व्हाल. तुमचा आदर वाढेल. उत्पन्न वाढेल. उत्पन्नाच्या बाबतीत दिवस चांगला आहे.
कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. आज काही अशी कामे करायची आहेत जी अडकली होती. अधिकार्यांच्या नजरेत असाल. वडिलांना प्रवासाला जावे लागू शकते. व्यवसायाच्या बाबतीत चांगल्या नफ्याची अपेक्षा केली पाहिजे. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे. आपल्या बोलण्याने प्रिय व्यक्तीस आनंदी ठेवाल. वैवाहिक जीवनात काही काळ थांबावे लागेल कारण जोडीदार काही चुकांमुळे नाराज असेल तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मीन
भाग्याची साथ मिळेल, ज्यामुळे सर्व कामे पूर्ण होतील. आज घेतलेल्या निर्णयांचा आगामी काळात खूप फायदा होणार आहे. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असू शकते. कामावर लक्ष केंद्रित करा. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कामाच्या बाबतीत दिनमान अनुकूल आहे. कामाबरोबरच लोकांच्या भल्यासाठीही काम करा.