बहुजननामा ऑनलाईन –
मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. परोपकाराच्या कामात दिवस घालवाल. इतरांना मदत केल्याने समाधान मिळेल. रात्री पत्नीला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकते, म्हणून काळजी घ्या. कार्यक्षेत्रात काही बदल तुमच्या बाजूने होऊ शकतात, ज्यामुळे सहकारी कर्मचार्यांचा मूड खराब होऊ शकतो, परंतु तुम्ही चांगल्या वागण्याने वातावरण सामान्य करण्यात यशस्वी व्हाल. संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
वृषभ
आज कुटुंबातील सदस्यांसह आनंदात वेळ घालवाल. दिवस धावपळीचा आहे, आरोग्याबाबत जागरूक रहा. दुपारी आनंदायी बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. संध्याकाळचा वेळ एखाद्या मंगलकार्यात घालवाल, ज्यामुळे आत्मसन्मान वाढेल. वैवाहिक जीवन सुखी होईल.
मिथुन
आज संमिश्र परिणाम मिळतील. वडिलांच्या आशीर्वादाने आणि उच्च अधिकार्यांच्या कृपेने एखादी मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळण्याची इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात व्यस्त असाल. व्यर्थ खर्च टाळावा लागेल, अन्यथा भविष्यात आर्थिक स्थितीची चिंता होऊ शकते. एखाद्या प्रिय किंवा महान व्यक्तीच्या दर्शनामुळे मनोबल वाढेल.
कर्क
जर आज एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो घाईत आणि भाविनक होऊन घेऊ नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप करावा लागेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल, ज्यामुळे धनलाभाची शक्यता आहे. ज्यामुळे पैशाची स्थिती मजबूत होईल. व्यवसायातील योजनांना गती मिळेल. आज पद व प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मार्गात येणारा अडथळा दूर होईल. रात्री देव दर्शनाचा लाभ घ्याल.
सिंह
राजकारणासाठी दिवस खूप लाभदायक आहे. अनेक दिवसांपासून एखादे काम रखडलेले असेल तर ते आज पूर्ण होईल, ज्यामुळे खूप आनंदी व्हाल. आरोग्याबद्दल जागरूक रहा, पचनक्रिया मंद होण्याची तसेच नेत्रविकार होण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ हास्यविनोद आणि प्रियव्यक्तींच्या दर्शनात जाईल. खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. संततीची धार्मिक कार्यात आवड वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
कन्या
आज विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची आवश्यकता आहे, तरच यश मिळेल. काही कौटुंबिक समस्या असतील तर त्या आज संपतील. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त असतील. राजकीय मदत सुद्धा मिळेल. संध्याकाळी अचानक धनलाभाचा मोठा योग आहे.
तुळ
आज विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात संधी मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत समोर येतील, जे रोजगाराच्या क्षेत्रात काम करतात त्यांना यश मिळेल, परंतु बोलण्यावर संयम ठेवला तर विशेष आदर मिळेल. व्यस्ततेमुळे हवामानचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. जोडीदाराची विशेष साथ आणि सहकार्य मिळेल. संध्याकाळी केलेला प्रवास सुखद आणि लाभदायक ठरेल.
वृश्चिक
आज काही प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो, परंतु धीर धरा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज रखडलेली कामे पूर्ण करण्याचा दिवस आहे. आर्थिक बाजू बळकट होईल आणि दिवसेंदिवस वाढेल. आज सायंकाळचा वेळ कुटूंबियांना भेटण्यात घालवाल. रात्री फिरण्याची आणि मौजमस्ती करण्याची संधी मिळेल. संततीच्या भविष्यासाठी एखादी नवीन योजना बनवू शकता.
धनु
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. जर कोर्ट-कचेरीचे एखादे प्रकरण सुरू असेल तर ते आज संपेल आणि विजय प्राप्त होईल. घरातील उपयुक्त वस्तूंवर पैसा खर्च होईल, परंतु आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. पैशाच्या व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर काळजी घ्या. विरोधकांचा पराभव होईल.
मकर
व्यवसायात केलेल्या काही नवीन बदलांचा तुम्हाला भरपूर फायदा होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत करण्यातही यशस्वी व्हाल. संध्याकाळी धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी प्रवास करू शकता, परंतु वाहनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. सायंकाळी वाहन नादुरूस्त झाल्याने खर्च वाढू शकतो. जर विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेची तयारी केली असेल तर ते यशस्वी होतील. मुलगा किंवा मुलीच्या विवाहाबाबत आज चर्चा होऊ शकते.
कुंभ
जर आज मालमत्ता खरेदी-विक्रीचा विचार करीत असाल तर त्यातील सर्व घटनात्मक बाबी गांभीर्याने तपासून पहा, अन्यथा नुकसान होऊ शकते. जोडीदाराची अचानक प्रकृती बिघडल्याने धावपळ करावी लागू शकते, तसेच पैसे खर्च होऊ शकतात. कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू असेल तर तो डोके वर काढू शकतो. परंतु आज कुटुंबातील वडीलधार्यांच्या सहकार्याने तो संपेल.
मीन
वैवाहिक जीवन सुखी राहील. दूरचा किंवा जवळचा प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांची आज मानसिक आणि बौद्धिक ओझ्याखालून सुटका होईल. सायंकाळी कुठेतरी फिरायला जाऊ शकता, ज्यामुळे मन शांत होईल. आज आई-वडीलांचा सल्ला उपयुक्त ठरेल, ज्यामुळे त्यांच्याबरोबर वेळ घालवाल.