मेष
आईच्या हृदयाजवळ असाल आणि तिच्याकडून आनंद मिळेल. कामात यश मिळेल. काही लोकांना नोकरीत बदल किंवा बदलीची बातमी मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस अनुकूल. प्रिय व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याची संधीही मिळेल. दिनचर्या अधिक चांगली बनविली तर दिवसाचा चांगला फायदा घेऊ शकता. मात्र, आरोग्याच्या बाबतीत दिवस थोडा कमजोर आहे. आज मनसोक्त घरखर्च कराल, दीपावलीसाठी खरेदी देखील करू शकता.
वृषभ
मनापासून आनंद होईल. भावंड किंवा मित्रांसमवेत बराच वेळ घालवाल. यामुळे मानसिक ऊर्जा वाढेल. जोडीदारा बरोबरचे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. अनावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नये. तरच चांगले काम करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. चांगले फायदे देखील मिळतील, कारण कुटुंबातील सदस्य सोबत राहतील. आरोग्याच्या बाबतीत दिवस थोडा कमजेार असू शकतो, म्हणूनच आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.
मिथुन
आर्थिक आघाडीवर यश मिळेल. कुठूनतरी पैसे गुंतविण्याचा फायदा मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करीत आहेत त्यांना जबरदस्त यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबरच्या नात्यात सुधारणा होईल. नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले होईल. कामाच्या अनुषंगाने अनुकूल परिणाम मिळतील. दिवस नोकरीमध्ये व्यस्तता आणि धापपळीचा असेल. काम वेळेवर करण्याचे आव्हान असेल.
कर्क
आज आनंदी आणि खूप भावनिक व्हाल. जुन्या आठवणींमुळे डोळे पाणावू शकतात. प्रत्येक कामात सक्रियपणे भाग घ्याल. सर्व कामे एकाचवेळी हातात घेतल्याने नंतर समस्या होऊ शकते, म्हणून कामाकडे लक्ष द्या. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. खर्च थोडा वाढेल, यासाठी उत्पन्नावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर ठरू शकतो. विवाहित लोक जोडीदाराशी प्रेमाने बोलू शकतात.
सिंह
अनेक दिवस रखडलेले काम पूर्ण होईल. मालमत्तेचा फायदा होऊ शकतो. यामुळे खूप आनंदी व्हाल. प्रेमसंबंधात दिवस अतिशय कमजोर असू शकतो. प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ शकते, ती नाराज होणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि एकमेकांबद्दल आदर तसेच सहानुभूती वाढेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. आज दुसर्या नोकरीसाठी अर्ज करू शकता.
कन्या
आजचा दिवस उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरेल. एकापेक्षा जास्त ठिकाणाहून पैसे मिळू शकतील. कामात यश मिळवून मजबूत उभे रहाल. आत्मविश्वास वाढेल. एखाद्याशी भांडणे हानिकारक ठरू शकते, म्हणून आपल्या कामाशी मतलब ठेवल्यास चांगले होईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस खूप सामान्य असेल. प्रेमसंबंधात चढ-उताराला सामोरे जावे लागू शकते. कोणताही प्रवास करणे टाळा. कौटुंबिक तणाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुळ
कामाकडे पूर्ण लक्ष द्याल आणि काही कमतरता तर राहिली नाही ना हे तपासत रहाल, यामुळे व्यस्त असाल. यामुळे कुटुंबाच्या जबाबदारीपासून दूर जाऊ नका. जबाबदारी समजून घ्या. समन्वय ठेवा. प्रेमसंबंधासाठी दिनमान खूप अनुकूल असेल. प्रिय व्यक्तीशी नाते दृढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदारासह बाजारात जाऊ शकता.
वृश्चिक
आज भाग्य तुमच्यासोबत उभे राहील. यामुळे कामात यश मिळेल. वडिलांशी आपले संबंध सुधारतील आणि समाजात चांगले स्थान मिळेल. आज कुठूनही चांगला धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर घरगुती आघाडीवरही तुम्ही मजबूत असाल, आणि कुटुंबात आनंद राहील, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान वाटेल. काम आणि मेहनतीने पुढ वाटचाल कराल. नोकरी करणार्यांना आज खूप चांगला वेळ मिळेल. कामाचे कौतुक होईल. विवाहित लोक जोडीदारासह सुंदर ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ शकतात.
धनु
आरोग्य थोडे कमजोर राहील. मानसिक ताणतणावही वाढू शकतो. ज्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात. भाग्याच्या कृपेने अनेक रखडलेली कामे होऊ शकतात. संपत्ती मिळण्याचे योग आहेत. आज प्रवासाला जाण्यासाठी दिवस उत्तम आहे. या प्रवासातून हवा असलेला आनंदाची प्राप्त होईल. आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येईल, जी तुम्हाला खूप प्रेम देईल. आपण कायमचे तिचे किंवा त्याचे प्रिय व्यक्ती बनू शकता. वैवाहिक जीवन थोडे कमजोर असेल. जोडीदार एखाद्या गोष्टींवरून रागावू शकतो, यासाठी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात आज काही अडचणी असू शकतात, प्रिय व्यक्तीला भेटण्यात काही समस्या येऊ शकतात.
मकर
आजचा दिवस इन्कममध्ये वाढीचे संकेत देत आहे, ज्यामुळे आनंद वाढेल. व्यवसायातही आज खूप नफा मिळू शकतो. कुटुंबातील प्रत्येकजण आनंदी होईल आणि सुग्रास भोजन कराल. चेहर्यावर आनंद असेल. वैवाहिक जीवनात प्रेमात वाढ होईल. प्रेमसंबंधात आजचा दिवस चांगले परिणाम देणारा असेल. वाढत्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. कारण आर्थिक स्थिती बिघडू शकतात.
कुंभ
आजचा दिवस अनेक प्रकारे लाभ देईल, नोकरी करणार्यांच्या कामाचे कौतूक होईल. तुमच्या सल्ल्याने काम करण्यास लोकांना आवडेल. आर्थिकदृष्ट्या दिवस मजबूत आहे. धनलाभाचे प्रबळ योग आहेत. वैवाहिक जीवन आज खूप आनंदी असेल. जोडीदाराच्या नातेसंबंधात प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात आज निराशेचा सामना करावा लागू शकतो. विनाकारण प्रवास केल्यास मानसिक त्रास होऊ शकतो. एखाद्याला आपल्याबरोबर घेऊन जा.
मीन
आज खरेदीमध्ये अधिक व्यस्त असाल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला तुमच्याकडून एखादी भेट मिळू शकते. प्रिय व्यक्तीला तुम्ही साथ द्याल. कारण ती तुमच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचा प्रयत्न करेल. वैवाहिक जीवनात संततीकडून चांगले परिणाम मिळतील. आनंदात वाढ होईल. उत्पन्न वाढेल, शिवाय उत्पन्न वाढीचे काही नवीन मार्ग देखील मिळू शकतात. जिथे काम करता तिथे काही लोकांमध्ये आपसात संघर्ष देखील होऊ शकतो. संध्याकाळ कुटुंबासमवेत घालवाल.