बहुजननामा ऑनलाइन टीम – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रिमो मायावती यांना भारतरत्न सन्मानाने सन्मानित(Bharat Ratna) करावे, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केली आहे. रावत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केले आहे. तसेच ही मागणी करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केली आहे.
सोनिया गांधी आणि मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाल किंवा नसाल. मात्र सोनिया गांधी यांनी भारतीय महिलाचा सन्मान आणि सामाजिक समर्ण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलांचे गौरवशाली स्वरुप मानले जात आहे. तर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा यावर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा, असे हरीश रावत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.