नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Honeymoon | विचार करा एखादे जोडपे हनीमून (Honeymoon) साजरा करण्यासाठी गेले असेल आणि त्यांच्याबाबत एखादी अशी घटना घडली की त्या दोघांना दहा दिवस वेगवेगळे झोपावे लागले असेल. इतकेच नव्हे, त्यांच्यापैकी एकाला तर अनोळखी लोकांसोबत रूम शेयर करून झोपावे लागले, असे हे हनीमून एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखे असेल. असाच प्रकार समोर आला आहे, जिथे एक कपल आपल्या लग्नांनतर हनीमून साजरा करण्यासाठी ज्या ठिकाणी गेले होते तिथे त्यांना एकमेकांपासून वेगळे राहून वेळ घालवावा लागला.
हा प्रकार ब्रिटनच्या वेस्ट लंडनमध्ये राहणार्या नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत घडला आहे. मेट्रोच्या एका ऑनलाइन रिपोर्टनुसार, 27 वर्षांची एमी आणि 33 वर्षांच्या एलबर्टी यांचा विवाह धुमधडाक्यात झाला. यानंतर त्यांनी आपला हनीमून प्लान बनवला आणि ते हनीमूनसाठी आयर्लंडच्या बारबाडोसला गेले. लंडनमध्ये दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, यानंतर त्यांना जाण्याची परवानगी मिळाली आणि ते निघाले. परंतु या दरम्यान त्यांच्याबाबत ही घटना घडली. ते जेव्हा ब्रिजटाऊन एयरपोर्टवर पोहचले, तेव्हा एलबर्टीची टेस्ट निगेटिव्ह आली, परंतु एमीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यानंतर दोघांची झोपच उडाली. स्थानिक अधिकार्यांनी येथेच एमीला एका सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये नेले आणि पुढील 10 दिवस तेथे राहण्यास सांगितले. तिकडे एलबर्टीने काहीतरी करून हॉटेलमध्ये रूम (Honeymoon) मिळवली आणि तिथे राहू लागला.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
आयसोलेशन सेंटरमध्ये एमीला अनेक अनोळखी लोकांसोबत रूम शेयर करावा लागला, जिथे पाणी आणि टॉयलेटची सुविधा सुद्धा व्यवस्थित नव्हती. सुमारे 10 दिवस ती तिथे राहीली. एमी आणि तिच्या पतीचे बोलणे फोन सुरू होते परंतु त्यांना भिती वाटत होती. दहा दिवसानंतर सुद्धा एमीच्या प्रकृतीत जास्त सुधारणा झाली नाही तेव्हा तिला सरकारी सेंटरमधून काढून एका आयसोलेशन वॉर्डमध्ये एकटीला ट्रान्सफर करण्यात आले. रिपोर्टमध्ये या गोष्टीचा सुद्धा उल्लेख आहे की, तिथे एमीच्या वॉर्डसाठी दररात्रीसाठी 22 हजार रुपये चार्ज केले जात होते. तर डॉक्टरांची फीस सुद्धा 18 हजार रुपये होती. त्यांनी ज्या हॉटलचे बुकिंग केले होते त्यांच्याकडून रिफंड सुद्धा मिळाला नाही. अशाप्रकारे त्यांचे हनीमून एक प्रकारे भीतीदायक स्वप्नासारखे ठरले. सध्या दोघे बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.
Web Title : Honeymoon | couple goes for honeymoon girl got isolation after covid positive
Viral Letter | दोन बालकांनी पीएम मोदी आणि सीएमला लिहिले ‘हे’ क्यूट पत्र, सांगितल्या आपल्या अडचणी
Raju Shetty | आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी