Home Finance | आता कामगार सुद्धा खरेदी करू शकणार आपले घर, ICICI होम फायनान्सने सुरू केली ‘ऑन-द-स्पॉट’ होम लोनची सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Home Finance | आयसीआयसीआय होम फायनान्स (ICICI Home Finance) ने स्वताचे काम करणारे कामगार आणि मजूरांना होम लोन देण्याची योजना सुरू केली आहे. हे लोन त्या लोकांना मिळेल, ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) कागदपत्र नसतात. अशा लोकांसाठी आयसीआयसीआय होम फायनान्सने ऑन-द-स्पॉट सरल होम लोन (On-the-spot saral home loan) देण्याची सुविधा सुरू केली आहे.
कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘बिग फ्रीडम मंथ’ (Big Freedom Month) अंतर्गत अशा लोकांसाठी ही योजना सुरू केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टेलर, पेंटर, ऑटो मॅकेनिक, ऑटो, टॅक्सी ड्रायव्हर तसेच इतर योजनांतर्गत ऑन-द-स्पॉट होम लोन घेऊ शकतात. त्यांना केवळ आपले पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट द्यावे लागेल.
अनेक प्रकारचे होम लोन उपलब्ध
आयसीआयसीआय होम फायनान्सचे एमडी आणि सीईओ अनिरूद्ध कमानी यांनी म्हटले की, बिग फ्रीडम मंथदरम्यान ऑन-द-स्पॉट होम लोनला मंजूरी दिली जाईल. आमच्या प्रत्येक शाखेत स्थानिक प्रतिनिधी असतील जे कमीतकमी कागदपत्रांसह लोन उपलब्ध करण्यात मदत करतील.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सबसिडी सुद्धा
कंपनीने म्हटले की, होम लोन घेणार्यांना या योजनेत पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत व्याज रक्कमेत 2.67 लाख रुपयांपर्यंत सबसिडीचा लाभ मिळेल. कमी उत्पन्न वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गासाठी ही एक कर्जाशी संबंधीत सबसिडी योजना आहे.
Web Title :- Home Finance | icici home finance launches on the spot home loan for workers having no itr
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Corona Vaccination in Maharashtra | राज्याने नोंदवला लसीकरणाचा नवा विक्रम !
Comments are closed.