पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – सोसायटीमधील मैदानात लहान मुले खेळत असताना एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सोसायटीतील एका अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी (Hinjewadi) पोलिसांनी अनंतराव किसनराव शिंदे (वय ६४, रा. मेगा पोलीस, हिंजवडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका मुलीने हिंजवडी (Hinjewadi) पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement
फिर्यादी ही ८ जून रोजी सायंकाळी सात वाजता मेगा पोलीस सोसायटीतील गार्डनमध्ये भावाबरोबर खेळायला गेली होती. तेथील लहान मुलांच्या असणार्या बाकड्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी याने तिचा हात पकडून दाबला. ती तो सोडवून घेत असताना त्याने हात धरुन ठेवला व तुला काय फील होतेय का असे विचारले.
त्याच्या अशा वागण्याने फिर्यादीला खूप भिती वाटली. ती तेथून उठू लागली.
त्यावेळी आरोपीने फिर्यादीचा हात धरुन अचानक तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.
ही गोष्ट या मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Web Titel : Hinjewadi A 64 year old senior molested a minor girl in Bhar Maidan
केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’