हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – दोन दिवसापूर्वी आडा पिंपरी शिवारात नांदेड-हिंगोली रोडवर स्कोडा गाडीतील खूनाचा murder उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. मित्रत्वाचे नाते ठेवून त्याच्या पत्नीशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याने मित्रानेच खून (murder) केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कैलास मारुतराव चिलटेवार (रा. तामसा) याला अटक केली आहे. माणिकराव राजाराम राजेगोरे (वय 50 रा.कलगाव हल्ली नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 4) नांदेड महामार्गावर रस्त्याच्या कडेला स्कोडा गाडीत एकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मृतदेहाची पाहणी केली. यावेळी मोबाईलचे तुकडे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. त्यातील सिमकार्डवरुन हा मोबाईल माणिकराव राजेगोरे याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पैशाच्या वादातून खून झाला असावा, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला हाेता. कैलास चिलटेवार याचा संभाषणाचा धागा राजेगोरेच्या सिमकार्ड वरून पोलिसांना मिळाला. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
…म्हणून मित्राने काटा काढला
आरोपी चिलटेवार अन् मृत राजगोरेंचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यातून माणिक हा चिलटेवारच्या घरी नेहमी ये-जा करत असे. त्यातूनच त्याने चिलटेवरच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने वाईट नजर टाकली. ही गोष्ट चिलटेवार यास समजल्याने चिलटेवारने एक मित्र सोबतीला घेऊन माणिकचा काटा काढण्याचा निश्चय केला.
दारु पाजून रुमालाने आवळला गळा
आरोपी चिलटेवारने माणिक राजेगोरेला दारू पाजून स्कोडा गाडीतून अर्धापूर ते डोंगरकडा या शिवारात आडव्या रस्त्यावर निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी राजेगोरे याचा रुमालाने गळा आवळून खून murder केला. त्यानंतर त्याला त्याच स्कोडा गाडीत टाकले. बाळापूर-वारंगा रस्त्याच्या पिंपरी शिवारात मैलाच्या दगडावर अपघात झाला असे भासवण्यासाठी गाडी रस्त्याकडेच्या ढिगार्यावर चढवली. यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे दार बंद असल्याने आग विझली. मात्र राजेगोरे याच्या मृतदेह अधर्धवट जळाला. चिलटेवार यास ताब्यात घेतले असता, त्याने खूनाची कबुली दिल्याची माहिती पाेलिसांनी दिली.