नवी दिल्ली :वृत्तसंस्था – High Security Number Plate | अनेक राज्यांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ( High Security Number Plate ) अनिवार्य केली आहे. जर तुम्ही सुद्धा आपल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSNP) लावलेली नसेल तर आणखी उशीर करूनका. कारण यामुळे तुमच्या अनेक कामात अडथळे येऊ शकतात. याबाबत जाणून घेवूयात –
कशी असते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट –
हा सिक्युरिटी नंबर प्लेटवर HSRP होलोग्राम स्टीकर असतो, ज्यावर वाहनाचा इंजिन नंबर आणि चॅसिस नंबर असतो.
हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पिन असेल. ही पिन एकदा वाहनाला लावल्यानंतर दोन्ही कडून लॉक होईल आणि उघडणार नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर अडकतील ही कामे
1 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकंड कॉपी
2 वाहनाचे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
3 अॅड्रेस चेंज
4 रजिस्ट्रेशनचे रिन्यूव्हेशन
5 नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट
6 हायपोथिकेशन कॅन्सलेशन
7 हायपोथिकेशन एन्डोर्समेंट
8 नवीन परमिट
9 टेम्पररी परमिट
10 स्पेशल परमिट
11 नॅशनल परमिट. इत्यादी.