पुणे : बहुजननामा ऑनलाईन – प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सुरु केलेली पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस विशेष गाडी (Pune-Solapur Hutatma Express) रद्द करण्यात आली आहे. 19 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत सोलापूर विभागातील भाळवणी ते भिगवण दरम्यान अभियांत्रिकी ब्लॉक आणि दुहेरी करणाचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पुणे-सोलापूर आणि सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील (Central Railway Solapur Division) प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधेसाठी गाडी सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने (railway administration) घेतला होता.
सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (Solapur-Pune-Solapur Hutatma Superfast Special Express) 1 जुलैपासून आठवड्यातील 5 दिवस सुरु करण्यात आली होती.
Web Titel :- Hence cancellation of Pune-Solapur Hutatma Express between 19th July to 31st August
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ED ची धाड