जळगाव न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात वनक्षेत्रात हेलिकॉप्टर (Helicopter Crash in Jalgaon) दुर्घटना झाली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर महिला पायलट (Female pilot) गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रशासनाचे पथक तातडीने रवाना झाले असून अद्याप पूर्ण माहिती स्पष्ट झालेली नाही. ही दुर्घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crashes in Jalgaon) आहे तो जंगल परिसर आहे. त्यामुळे त्याठिकाणी मदतकार्य पोहचण्यास अडचणी येत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Helicopter Crashes in Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील चोपडा शिवारात हेलिकॉप्टर कोसळले; 2 जणांचा मृत्यू तर महिला पायलट गंभीर जखमी#HelicopterCrashes #Jalgaon #ACCIDENT pic.twitter.com/dDtO4nmjVr
— Policenama (@Policenama1) July 16, 2021
चोपडा तालुक्यातील वर्डी शिवार असलेला भाग हा आदिवासी परिसर आहे.
सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात ही घटना घडील आहे.
दुर्घटना झालेले हेलिकॉप्टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान (Trainee aircraft) आहे ही माहिती अद्याप समजू शकली नाही. परंतु हेलिकॉप्टर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
Jalgaon News । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन गटात हाणामारी
यामध्ये दोन जणांचा मृत्यू (Death) झाला तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.
आदिवासी परिसर असल्याने तेथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्टर मधील महिला पायलटला जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले.
घटनेची माहिती मिळताच चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी रवाना झाले आहेत.
Maharashtra: One person dies, another injured in a chopper crash in Jalgaon; police & local authorities on the spot. Details awaited pic.twitter.com/Mc0aUPsWKA
— ANI (@ANI) July 16, 2021
दुर्घटना घडली ते ठिकाण जंगलात आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी काही किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे अवघड झाले आहे.
तरी देखील बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून (district administration) देण्यात आली आहे.
Web Title : Helicopter Crashes in Jalgaon | helicopter crashes in chopda in jalgaon district fear of death of two
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update