Helicopter Crash In Bavdhan Pune | क्रॅश झालेलं हेलिकॉप्टर राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंना घ्यायला मुंबईत जात होतं; त्यापूर्वीच पुण्यात घडली मोठी दुर्घटना (Video)
पुणे: Helicopter Crash In Bavdhan Pune | बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीस्थित एका कंपनीच्या मालकीचे हे हेलिकॉप्टर पुण्यातील ऑक्सफोर्ड काउंटी रिजॉर्ट येथील हेलीपॅडवरून (Oxford County Resort Pune Helicopter Booking) उड्डाण करत होते. पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या बावधन बुद्रुक येथील डोंगराळ भागात धुक्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळतेय. अपघात झाल्यानंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि त्यात असलेल्या दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) मुंबईत घ्यायला जात होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई ते सुतारवाडी असा प्रवास सुनिल तटकरे करणार होते. त्यासाठी पुण्याहून मुंबईसाठी हेलिकॉप्टर जात होते. काल हे हेलिकॉप्टर परळीत होते.
अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस (Hinjewadi Police), अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांची पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त क्षेत्रात बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. परंतु, या भीषण अपघातामुळे हेलिकॉप्टरमधील तीनही जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.