नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही नवीन कार घ्यायचा विचारात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असून होंडाच्या वाहनांवर पाच लाख रुपयांपर्यंत बम्पर सवलत देत आहे. या ऑफर होंडाच्या सर्व कारवर उपलब्ध असून ऑफर अंतर्गत तुम्हाला रोख सवलत आणि लाखाहून अधिक रुपयांच्या एक्सचेंज बोनससारखे फायदे मिळू शकतात.
जाणून घ्या कोणत्या कारवर काय आहे ऑफर ?
होंडाची लोकप्रिय कार होंडा अमेझवर ४२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार असून या कारवर रोख सवलत मिळणार नाही. पण कंपनी या कारवर पाच वर्षाची एक्स्टेंन्ट वॉरंटी आणि कार एक्सचेंजवर ३० हजार रुपयांपर्यंत सूट देणार असून अमेझ तुम्हाला १.२ पेट्रोल आणि १.५ डिझेल इंजिनमध्ये मिळते.
होंडाच्या जाझवर तुम्ही ५० हजर रुपयांची बचत करण्याचे शक्य असून तिच्यावर २५ हजार रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि कार एक्सचेंजवर २५ हजार रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.
होंडा डब्ल्यूआर-व्ही २०१९ च्या पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायांवर ४५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार असून २५-२५ हजार रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.
होंडा सिटी होंडाच्या सर्वाधिक विक्री करणार्या वाहनांपैकी एक आहे. होंडा सिटीवर तुम्हाला रोख सवलत आणि एक्सचेंज बोनससह ७२ हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.
होंडा-बीआरव्हीलाही ही ७-सीटर कार एसयूव्हीपेक्षा अधिक एमपीव्ही देते. जर तुम्ही बीआरव्ही खरेदी केली तर तुम्हाला १.१० लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
होंडाने मागील वर्षी भारतात होंडा सीआर-व्ही लाँच केली असताना या कारच्या डिझेल एडब्ल्यूडी मॉडेलवर कंपनी पाच लाख पर्यंतची रोख सवलत देत आहे. जर तुम्ही 2 डब्ल्यूडी (व्हील ड्राईव्ह) डिझेल मॉडेल विकत घेतले तर तुम्हाला चार लाख रुपयांची सूट मिळू शकते.
होंडाची प्रीमियम सेडान कार सिविकवर अडीच लाख रुपयांपर्यंत बम्पर सूट मिळणार असून कारच्या २०१९ च्या मॉडेलवर ही ऑफर उपलब्ध असेल.