बहुजननामा ऑनलाइन : प्रत्येक व्यक्तीची आपल्या मृत्यूपूर्वी काहीना काही अपेक्षा असतात. ज्या पूर्ण होण्याची त्यांची इच्छा असते. अशीच एक इच्छा एक व्यक्तीने व्यक्त करत आपल्या मृत्यूच्या आधी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तो जगातून निघून गेला. हे प्रकरण अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिएटल शहरातील आहे. ७५ वर्षीय रॉबर्ट फुलर यांना गंभीर अश्या कर्करोगाने आजाराणे ग्रासले होते. त्यानंतर त्याने स्वत: चे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला.
वॉशिंग्टन हे अमेरिकेतील नऊ राज्यांपैकी एक राज्य आहे जिथे गंभीरपणे आजारी लोकांना सन्मानाने मृत्यू देण्याची कायदेशीर तरतूद आहे. रॉबर्टच्या मृत्यूच्या आधी बरेच फोटो समोर आले आहेत, जे मनाला धक्का देणारे आहेत. रॉबर्टने मृत्यूपूर्वी आपल्या जोडीदाराशी लग्न केले आणि आवडते संगीतही ऐकले. यानंतर त्यांनी १० मे रोजी वॉशिंग्टनच्या ‘डेथ विथ डिग्निटी’ कायद्या अंतर्गत मृत्यूला मिठी मारली.
रॉबर्टच्या शरीरात गंभीर असा कर्करोग आढळला. आयुष्यातील शेवटचा दिवस त्याला केमोथेरपीने घालवायचा नव्हता. डॉक्टरांनी त्याला आयुष्य संपविण्याची परवानगी दिली. रॉबर्टने अल्कोहोल आणि झोपेच्या औषधांच्या माध्यमातून आयुष्य संपवले. यापूर्वी त्याने आपला पुरुष जोडीदार रीस बॅक्सटर फुलरशीही लग्न केले होते. रॉबर्ट म्हणाले की ८० च्या दशकात एड्स ग्रस्त झाल्यानंतर, तो बर्याच वर्षांपासून मृत्यूसाठी तयार होता. आपल्या मृत्यूच्या आधी, त्या व्यक्तीने सिएटलच्या घरी एक पार्टी आयोजित केली होती जिथे त्याने मित्रांना निरोप दिला आणि गाणी आणि कविता ऐकल्या. त्याचे मित्र आणि नातेवाईक पार्टीत व्यस्त होते. मित्रांसह आनंद साजरी केल्यानंतर त्याने इंजेक्शनद्वारे आयुष्याचा शेवट केला.यापूर्वी त्याने आत्महत्येसाठी दोन डॉक्टरांकडून परवानगी मागितली होती. दोन्ही डॉक्टरांनी त्याला लेखी मृत्यूची परवानगी दिली. त्यानंतर त्याने एका मेडिकल स्टोअरशी संपर्क साधला ज्याने त्याला यासाठी औषधे देण्यास सहमती दर्शविली.