Heart Attack | शास्त्रज्ञांना मिळाले जबरदस्त यश! हार्ट अटॅकबाबत आता आधीच समजणार

Heart Attack | health preventive drug for heart attack scientist discover new gene to predict coronary disease

बहुजननामा ऑनलाईन टीम – मागील काही वर्षांपासून हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २५ वर्षांची मुलेही आता हार्ट अटॅकला बळी पडत आहेत. बहुतांश हार्ट अटॅक किंवा कोरोनरी हार्ट डिसीजसाठी जीवनशैली कारणीभूत असली तरी, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोरोनरी हार्ट डिसीज आणि हार्ट अटॅकमध्ये (Heart Attack) जीनची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजेच शास्त्रज्ञांनी हार्ट अटॅकसाठी जबाबदार असलेल्या जीनचा शोध लावला आहे. या जीनचा शोध लागल्यानंतर भविष्यात या जीनला दाबण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव निष्क्रिय करण्यासाठी औषधे बनवता येतील (Prevention of Heart Attack).

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हार्ट अटॅक जबाबदार जीन
एचटी न्यूजनुसार, हे संशोधन न्यूयॉर्कमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनमधील कार्डियाक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या टीमने केले आहे. हे संशोधन जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनात दावा करण्यात आला आहे की, या संशोधनानंतर हृदयविकार टाळण्यासाठी नवीन औषध बनवता येऊ शकतात.

 

प्रमुख संशोधक प्रोफेसर जेसन कोवासिक यांनी सांगितले की, या संशोधनामुळे हृदयविकारावर (Heart Attack) नियंत्रण ठेवण्यासाठी तीन महत्त्वाचे यश मिळाले आहे. हृदयविकारासाठी कोणते विशिष्ट जीन कारणीभूत आहे हे प्रथमच समजले आहे. याशिवाय शरीराच्या कोणत्या भागात हे जीन्स प्रभावी आहेत हे आम्हाला स्पष्टपणे समजले. हे जीन हृदयाच्या धमन्यांमध्ये असण्याची शक्यता आहे जे ब्लॉकेजसाठी थेट जबाबदार आहेत. याशिवाय, हे लिव्हरमध्ये देखील असू शकते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

 

जीन शरीराच्या कोणत्या भागात हे ओळखले
प्रोफेसर कोव्हॅसिक यांनी सांगितले की, तिसरे मोठे यश म्हणजे या जीनचे रँकिंग करण्यात यश मिळाले.
हे एकूण १६२ जीन्स आहेत ज्यांना प्राथमिकतेसाठी स्थान देण्यात आले होते आणि ते कोरोनरी हार्ट डिसीजसाठी जबाबदार आहेत.
या यादीत आढळलेल्या काही प्रमुख जीनचा हृदयविकाराच्या संदर्भात यापूर्वी कधीही अभ्यास केला गेला नव्हता.
हे नवीन महत्त्वाची जीन्स शोधणे खरोखरच रोमांचक आहे, परंतु एक आव्हान देखील आहे
– कारण अजूनपर्यंत कुणालाही माहित नाही की त्यापैकी किती कोरोनरी डिसीज किंवा हार्ट अटॅकचे निमित्त ठरतात.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Attack | health preventive drug for heart attack scientist discover new gene to predict coronary disease

 

हे देखील वाचा :

Pranav Dhanawade | जेव्हा शाळकरी मुलाने क्रिकेट विश्वात उडवली होती खळबळ, एका मॅचमध्ये बनवल्या १००० धावा

BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस