बहुजननामा ऑनलाईन टीम : एक्सपर्ट मानतात की, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे आरोग्य बिघडू शकते, कितीही हेल्दी पदार्थ खाल्ले तरी सुद्धा असे होऊ शकते. सर्व खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळी पोषकतत्व असतात जी, जसे शरीर तसा परिणाम करतात. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वस्तूंसोबत कोणत्या वस्तूंचे सेवन टाळले पाहजे.
हे कॉम्बिनेशन टाळा
1 जेवनासोबत फळ
फळ आणि खाद्यपदार्थ एकाचवेळी खाणे चांगले नाही. कारण फळात सिंपल शुगर असते तिला पचनाची आवश्यकता नसते. अशाप्रकारे ती जास्त वेळ पोटात राहते. फॅट, प्रोटीन आणि स्टार्चयुक्त पदार्थ पोटात जास्त वेळ राहतात. कारण त्यांना पचनाची आवश्यकता असते. यासाठी जेवणासोबत किंवा नंतर फळ खाल्ल्यास मळमळ, उलटी, बेचैनी अशा समस्या होऊ शकतात.
2 दूधासोबत काहीही नको
आयुर्वेदानुसार दूधासोबत कधीही अन्य वस्तूंचे सेवन करू नका. दूध एक संपूर्ण आहार आहे. याच्या पचनासाठी संपूर्ण पचनक्रियेची आवश्यकता असते. दूधात अन्य प्रोटीनयुक्त वस्तू जसे की, मांस, अंडे, सुकामेवा इत्यादीच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे प्रोटीन आहे.
3 फणस आणि कारल्याची भाजी, दूध, दही
फणस आणि कारल्याची भाजी सर्वांनाच आवडते. परंतु या भाज्या खाल्ल्यानंतर किंवा सोबत तुम्ही दूध किंवा दही सेवन करू नये. यामुळे त्वचारोग, जसे की खाज, एग्झिमा, सोरायसिस इत्यादी होऊ शकते.
4 केळे आणि दूध
आयुर्वेद या कॉम्बिनेशनला सर्वात जड आणि विषारी मानते. हे कॉम्बिनेशन शरीरात जडपणा निर्माण करणे आणि मेंदू संथ करण्यासाठी ओळखले जाते. जर जिमला जात असाल आणि मोठ्या प्रमाणात दूध-केळे सेवन करत असाल तर लक्षात ठेवा की, केळे पिकलेले असावे आणि केळे खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने दूध सेवन करावे.
5 दूध आणि उडीद डाळ
कधीही उडीद डाळीसोबत दह्याचे सेवन करू नये. हे दोन्ही एकाचवेळी सेवन केल्याने विष तयार होऊ शकते आणि शरीराचे नुकसान होऊ शकते.
6 मांस आणि बटाटा
मुस्लिम कुटुंबामध्ये नेहमी मांसात बटाटे टाकून शिजवले जाते. चवीला हे निश्चितच स्वादिष्ट असले तरी यामुळे हळुहळु आरोग्य बिघडू शकते. एक्सपर्टनुसार, अॅनिमल फॅट कार्बोहायड्रेटसोबत खाल्ल्याने विविध पचनरस एकमेकांची प्रभावशीलता कमी करतात. यामुळे गॅस आणि पोट फुगणे अशा समस्या होऊ शकतात.
7 जेवणासोबत कोल्ड ड्रिंक्स
हे कॉम्बीनेशन टाळावे. यामुळे पचनशक्ती कमी होते. पचन समस्यांसह अॅलर्जी आणि ताप सुद्धा येऊ शकतो. हा नियम आईसक्रीम आणि थंड दह्यालाही लागू होतो.
8 दुधासोबत तुळस
जर कोणत्याही श्वसन किंवा व्हायरल संसर्गाच्या स्थितीत तुळस किंवा टॅबलेट घेत असाल तर त्यानंतर ताबडतोब दूध पिणे टाळा. दोन्हीमध्ये किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवा.