बहुजननामा ऑनलाईन टीम – सामान्यपणे लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. अशा डाएट प्लॅनमध्ये कार्बोहायड्रेट्स, शुगर, प्रोटीन आणि कॅलरी कमी घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु गोलो डाएटमध्ये खाण्यापिण्यावर कोणताही प्रतिबंध नाही. गोलो डाएटचे तज्ज्ञ सांगतात की, केवळ डाएट आणि वर्कआऊट करून वजन कंट्रोल होत नाही. यासाठी हार्मोन बॅलन्स सुद्धा खुप आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा लठ्ठपणाने त्रस्त असाल तर गोलो डाएटचा आधार घेऊ शकता. हे डाएट फॉलो केल्याने तुम्हाला खुप लवकर आराम मिळू शकतो. जाणून घेवूयात…
गोलो डाएट प्लॅन
या डाएटमध्ये मेटाबॉलिक फ्यूल मेट्रिक्सवर विशेष लक्ष दिले जाते, जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि व्हेजिटेबल्समधून प्राप्त होते. सोबतच वर्कआऊट सुद्धा आवश्यक आहे. या डाएटसोबत वर्कआऊट केले तर वजनावर नियंत्रण राहते.
आहारात या गोष्टींचा करा समावेश
* यासाठी प्रोटीनमध्ये अंडे, मांस, आणि डेयरी प्रोडक्टचा आहारात समावेश करा.
* कार्बोहायड्रेटमध्ये बेरीज, फळ, शकरकंद, बटाटा, बिन्स आणि कडधान्याचा समाावेश करा.
* भाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, कोबी आणि काकडी इत्यादी सेवन करा.
* फॅटमध्ये ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, आळशीचे बी सेवन करा.
हा डाएट दिवसात तीनवेळा सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे वाढणारे वजन नियंत्रित केले जाऊ शकते.