बहुजननामा ऑनलाइन टीम – दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या समस्यांचा सामना सर्वाधिक महिलांना(menstruation) करावा लागतो. पाळी न येण्याचं सगळ्यात मोठं कारण गर्भधारणा हे असते. गर्भधारणेसाठी कोणतंही प्लॅनिंग न करता तरीही मासिक पाळी येण्यास उशीर होत असेल तर जाणून घ्या ही ९ कारणं …
– ताण तणाव
ताणतणावाचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. ताण तणावामुळे-GnRH नावाचे हार्मोनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ओव्यूलेशन उशिरा सुरू होऊन पाळी उशिरा येते. तुमच्या आयुष्यात जास्त ताणतणाव असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
– आजारपण
अचानक ताप, सर्दी, खोकला येणं किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळे पीरियड्स देखील लांबू शकतात. हे तात्पुरते होते आणि एकदा आपण रोगातून बरे झाल्यावर आपली पाळी वेळेवर येते.
– दिनचर्यात बदल
वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, शहरातून बाहेर जाणं किंवा लग्नासाठी किंवा इतर फंक्शनसाठी आपली दिनचर्या बदलते. त्यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊन पाळी उशिरा येण्याची शक्यता असते.
– ब्रेस्टफीडिंग
अनेक महिला जोपर्यंत बाळाचे स्तनपान करत असतात. तोपर्यंत त्यांना नियमित पाळी येत नाही.
– बर्थ कंट्रोल पिल्स
अन्य काही औषधांमुळे, बर्थ कंट्रोल पिल्समुळे मासिक पाळीची सायकल बदलते. अशी औषधं घेतल्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा जास्त लवकर येते अनेकदा दोन ते तीन महिने वाट पाहावी लागू शकते. अशा स्थितीत तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचे ठरेल.
– लठ्ठपणा
लठ्ठपणा हे मासिक पाळी न येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. महिलांना पाळी दर महिन्याला तारखेला येते. पण अचानक ३ ते ४ किलोंनी वजन वाढलं तर हार्मोनल बदलांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यासाठी रोज व्यायम करणं फायदेशीर ठरेल. शारीरिक हालचाल केल्यास, भरपूर पाणी पिल्यास शरीर निरोगी राहते. परिणामी पाळी वेळेवर येते.
– प्री मेनोपॉज
याच्या ३५ आणि ४० वर्षानंतर ही समस्या उद्भवू शकते. मासिक पाळी येणं थांबण्याआधी अनेक महिने पाळी अनियमित व्हायला सुरूवात होते.
– वजन जास्त कमी होणं
शरीराला पोषक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. जर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे फॅट्स योग्य प्रमाणात नसतील तर अनियमित होऊ शकते.
– थायरॉईड
आपल्याला थायरॉईड संबंधित कोणतीही समस्या असल्यास मासिक पाळीवर देखील परिणाम होतो. आपल्याला थायरॉईडची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्या. गळ्यातील थायरॉईड ग्रंथी चयापचय नियंत्रित करते. शरीराच्या अनेक फंक्शन्समध्येही याची भूमिका महत्वाची असते.