नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात थैमान घातलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. यापूर्वी कोरोना उपचारासाठी जे उपाय केले जात होते. जी औषधे दिली जात होती ती आता हटवली आहेत. महत्वाचे म्हणजे वाफ घेणे, व्हिटॅमिनची गोळी खाणे आदी गोष्टीचा यात समावेश आहे. नव्या गाईडलाईननुसार कोरोनाबाधितांना हे न करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.
काय आहे नवीन गाईडलाईन
1) वाफ घ्यायची नाही.
2) कोणतेही अँटीबायोटीक घेऊ नये.
3) कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घेऊ नये.
4) आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाही.
5) Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करू नये.
6) ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.
ऑक्सिजन अन् स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. आता पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी केली आहे.
कृपया हे देखील वाचा:
वाघोली मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, सकाळच्या सुमारास चाकरमान्यांचे प्रचंड हाल
संशोधकांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अॅण्टीबॉडीज निर्माण करण्यात ‘कोव्हॅक्सिन’ पेक्षा ‘कोव्हिशिल्ड’ सरस
पकडायला आलेल्या पोलिसांना तडीपार गुंडाची धक्काबुक्की
‘ट्विटरच्या ब्लू टीकपेक्षा लसीकरणाच्या टीक्याकडे लक्ष द्या’; राष्ट्रवादीचा PM मोदींवर निशाणा