नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटंट व्हेरिएंटमुळे देश वाईट आवस्थेतून वाटचाल करत आहे. संक्रमितांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची चेन तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लोक आपल्या घरांमध्ये पुन्हा बंद झाले आहेत. ही स्थिती पाहता सरकारने एक नवी गाईडलाईन जारी करून कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. डबल मास्क घालताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात…
– सर्जिकल मास्क घाला, आवश्यकता भासल्यास घरीसुद्धा मास्क घाला.
– दोन मास्क घालून घरातून बाहेर पडा. यापैकी एक सर्जिकल मास्क आणि दुसरा तीन थरांचा मास्क असावा.
– आपल्या सुविधेनुसार घरीच तीन थरांचा मास्क बनवू शकता.
– मास्क घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तोंड पूर्ण कव्हर झाले पाहिजे. नाकाच्यावर चांगल्याप्रकारे लावा.
– मास्कमध्ये श्वास घेण्यास त्रास होत नसल्याचे तपासून घ्या.
– कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनपासून बचासाठी एन-95 मास्कचा वापर करा.
काय करू नये
-एकाच प्रकारचे दोन मास्क अजिबात वापरू नका.
-एकच मास्क दोन दिवसांपर्यंत सतत वापरू नका.
-कपड्यांचा मास्क ठराविक कालावधीनंतर स्वच्छ करा.