Health Benefits Of Ghee | केसांसाठी तूप अतिशय उपयुक्त घटक; ‘हे’ आहेत त्याचे फायदे, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम – Health Benefits Of Ghee | तुप हे माणसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे घटक आहे. आहारामध्ये तुपाचा समावेश असल्यास त्या पदार्थाला देखील चांगली चव येते. तुपाचे सेवन जसे आहारासाठी आहे. त्याचबरोबर केसासाठी देखील तुपाचा उपयोग (Ghee Is Also Used For Hair) होतो. केसांवर याचा वापर केल्याने केसांना पोषण मिळते. असे केल्यास केसांच्या समस्या देखील सुटणार आहेत. तुपात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म (Antimicrobial And Antifungal Properties) असतात जे बॅक्टेरिया आणि बुरशीपासून टाळूचे संरक्षण करतात. यामुळे केसांना तूप लावल्यास फायदा (Health Benefits Of Ghee) काय होईल? जाणून घ्या.
1. केस पांढरे होण्यापासून वाचवते (Prevents Hair From Turning White) –
खाण्याच्या चुकीच्या सवयीचे परिणाम केसांवरही दिसून येतो, केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळतात. जर तुम्हाला पांढऱ्या केसांचा त्रास होत असेल तर केसांना तूप लावा. तूप लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस पांढरे होणे थांबते. (Health Benefits Of Ghee)
2. केसांचा कोरडेपणा दूर करते (Eliminates Dryness Of Hair) –
केसांना तूप लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि गुंतलेले केस सोडवणे सोपे होते. तूप केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवते आणि केसांचा कोरडेपणा दूर करते.
3. कोंड्यावर उपचार करते (Treats Dandruff) –
केसांना तूप लावून कोंडा दूर होतो. तूप मलासेझिया फर्फर नावाच्या बुरशीची वाढ थांबवू शकते. मलासेझिया फर्फर (Malassezia Furfur) बुरशी हे कोंडा होण्याचे मुख्य कारण मानले जाते. तुपात बॅक्टेरिया आणि बुरशीविरोधी दोन्ही गुणधर्म असतात, ज्यामुळे ते केसांना कोंडा होण्यापासून वाचवते.
4. केस मऊ करते (Makes Hair Soft) –
केसांना तूप लावल्याने केस मुलायम आणि निरोगी होतात. फॅटी अॅसिडने भरपूर असलेले तूप केसांना पोषण देण्यासोबतच केसांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवते.
5. केस गळणे थांबवते (Stops Hair Loss) –
केसांमध्ये पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळायला सुरुवात होते. केसगळती रोखण्यासाठी तुपाचा वापर खूप गुणकारी आहे. तुपातील पोषक घटक केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Health Benefits Of Ghee | do you know these health benefits of ghee very useful for hair
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Comments are closed.