बहुजननामा ऑनलाईन – आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकताच तुम्हाला धक्का बसेल कारण ही बाब रेड लाईट एरियामधून आपल्यासमोर आली आहे, जेथे एखादा व्यक्ती रेड लाईट एरियामध्ये गेला की तेथे आपल्या सर्वांना माहित आहे की, तो व्यक्ती रेड लाईट एरियामध्ये का जातो ?
त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहित आहे की, रेड लाईट एरियामध्ये मुली काय काम करतात. त्यामध्ये काम करणाऱ्या मुली आपले पोट भरण्यासाठी ते काम करत असतात. त्यांचे हे काम करणे म्हणजे कोणाची मजबूरीच असते तर काहींची हे काम करण्याची इच्छा असते. जर कोणती मुलगी या एरियामध्ये जाते तेव्हा तिचे बाहेर येणे कठीण असते.
याच एरियामधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या प्रकरणात एक व्यक्ती रेड लाईट एरियामध्ये मज्जा मारण्यासाठी गेला आणि त्यानंतर त्याला तिथे चक्क त्याच्या मित्राची बहिण दिसली. तिचा पाहताच या व्यक्तीला धक्काच बसला कारण ती मुलगी मागील चार वर्षांपासून गायब होती. मुलीने तिच्या भावाच्या मित्राला पाहताच ओळखले आणि मुलाने ही आपल्या मित्राच्या बहिणीला ओळखले.
मुलीने सांगितले की, तिला जबरदस्तीने येथे आणले गेले आणि नंतर तिला या दलदलीत ढकलले गेले. त्यानंतर तात्काळ या व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली, माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचले आणि मुलीला तेथून बाहेर काढले. दुसर्याच दिवशी ही मुलगी आपल्या परिवाराकडे पोहचली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.