बहुजननामा ऑनलाईन टीम : आपल्या होणाऱ्या पत्नीकडून उधार घेतलेले ६० हजार रुपये परत करण्यासाठी एका मोबाईल दुकानदाराने आपल्या शेजारील वृद्धेलाच लुटून ,नंतर तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ७० वर्षीय या महिलेला लुटून त्याने ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली. या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी त्याने तिला पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला पण वजन जास्त असल्याने त्याला हे करता आले नाही. त्यांतही त्याने मृतदेहाला तूप लावून, परफ्युम मारून जाळण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु आसपास गोंधळ उडाल्याने त्याने तेथून मागच्या दरवाज्याने पळ काढत, शेजारील गच्चीवर जाऊन लपला, शेजारील व्यक्तीस समजल्याने आरोपीने तेथून पळ काढला आणि आपल्या होणाऱ्या पत्नी आणि मित्राला भेटला त्याने तिला आपल्याकडून मोठी चूक झाली असून माझ्याबरोबर चल असे सांगितले, परंतु तिने हे मान्य न केल्यानं तो मित्राचा मोबाईल घेऊन पळाला, पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केला असून तीन तुकड्यांना त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले आहे.
पश्चिम एसपी अवघेशी गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपेश गंगवाणी असे या आरोपीचे नाव असून त्याने कॉलनीतीन प्रेम झमटानी यांची हत्या केली आहे द्वारकापुरी येथील एका मुलीसोबत तो १२ नोव्हेंबरला लग्न करणार होता. त्याने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आपल्या होणाऱ्या पत्नीकडून ६० हजार रुपये उधार म्हणून घेतले. दीपक हा मोबाईलच्या दुकानात कामाला होता, परंतु दुकानावर छापा पडल्याने दुकान बंद झाले होते. त्याने दुसरीकडे दुकान सुरु करण्याचे ठरविले, परंतु इकडे होणाऱ्या बायकोने ६० हजार परत करण्याची मागणी केली, अन्यथा लग्न करणार नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर त्याने इतर लोकांकडूनही उधारी पैसे घेतले होते त्यामुळे त्याच्याकडे नेहमी लोक पैसे मागायला येत असे, या सर्वांपासून सुटका होण्यासाठी त्याने जवळ राहणाऱ्या वृद्ध महिलेला लुबाडण्याचे ठरविले, जी नेहमी सोन्याचे कडे आणि ज्वेलरी घालत असे, वृद्ध महिला हि एकटीच राहत असल्याने दीपक ने तिला लुटून आपले सगळे कर्ज फेडण्याचे ठरविले. त्याने एका रिकाम्या फ्लॅटच्या छतावरून वृद्धेच्या घरात प्रवेश केला तिच्याकडचे पैसे , दागिने घेऊन तिला लुबाडले आणि ओढणीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली, आरोपीने घरातील किमती वस्तू देखील चोरल्या आहेत.
आरोपीने वृद्ध महिलेचा मोबाईल देखील पळवून नेला होता, वृद्धेच्या सुनेचा फोन आल्यानंतर त्याने फोन उचलत वृद्धेचा अक्सिडंट झाला असून त्यांना अरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे सांगितले. त्याने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावता येईल. परंतु परिसरात गोंधळ उडाल्याने त्याने तेथून पळ काढला आणि शेजारील व्यक्तीच्या छतावर जाऊन लपला. ही बाब घरमालकाच्या लक्षात येताच त्याने दीपकला विचारले असता, त्याने मोबाईलच्या कारणामुळे पोलीस मागे लागले आहेत , म्हणून लपून बसल्याचे सांगितले. आणि तेथूनही पळ काढला, शेजारच्यांनी त्याच्या पाठलाग केला पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल ट्रॅकरच्या साहायाने तो सध्या ट्रेनने प्रवास करत असल्याचे समजले आहे. दिपकची आई घरी पापड बनविण्याचे काम करते तर भाऊ मोबाईलच्या दुकानावर काम करत आहे.
Visit : bahujannama.com