बहुजननामा ऑनलाइन : दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज हाशिम अमला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्त्याने टी २० , कसोटी , एकदिवसिय अश्या सगळ्याच मालिकांधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अर्थातच त्याच्या चाहत्यांकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे.
अमला हा गेली १५ वर्षे दक्षिण आफ्रिका संघाकडून क्रिकेट मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होता. त्याने १८ हजारांहून जास्त धावा केल्या असून, त्यात ५५ शतक आणि ८८ अर्धशतक आहेत. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट सामन्याच्या वेळी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जोंस याने हाशिम अमला याला दहशतवादी म्हंटले होते, जोंस च्या प्रकारामुळे त्याला कमेंट्री पॅनल मधून काढून टाकण्यात आले होते.
हाशिम अमला च्या अत्यंत धार्मिक स्वभावामुळे त्याला नेहमी दंड भरावा लागतो. दक्षिण आफ्रिकेची स्पॉन्सर कंपनी हि एक बिअर कंपनी असल्याने , त्या कंपनीचा लोगो लावण्यास हाशिम याने नकार दिला . त्यामुळे त्याला प्रत्येक महिन्याला ५०० डॉलर इतका प्रचंड दंड भरावा लागतो. त्याचप्रमाणे तो रमजान देखील पाळतो , २०१९ च्या वर्ल्ड कप वेळी देखील हाशिमचे रमजान चे उपवास होते.