नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील खट्टर सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी भाजपच्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या आठवणीत अंबाला नगर बस स्थानकाचे नाव बदलून त्याला सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आहे.
याबद्दल हरियाणाचे परिवहन मंत्री मुलचंद शर्मा यांनी शुक्रवारी जाहीर केले. अंबाला येथील रहिवासी असलेल्या सुषमा स्वराज या देशाच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व होते, त्यामुळे त्यांच्या जयंती निमित्त १४ फेब्रुवारीला बस स्थानकाचे नाव बदलण्यात येणार आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
१४ फेब्रुवारी रोजी सुषमा स्वराज यांचा जन्म दिवस असून त्यामुळेच बस स्थानकाचे नामकरण देखील त्याच दिवशी करण्यात येणार आहे. यामुळे इतर मुलींनाही त्यांच्या कामामध्ये प्रेरणा मिळेल, असेही शर्मा यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com