बहुजननामा ऑनलाईन टीम – Harbhajan Singh | भारताचा स्टार क्रिकेटर सध्या वाईट फॉर्ममधून जात आहे. तो धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. वारंवार संधी मिळूनदेखील तो अपयशी ठरत असल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावरून माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात केएल राहुल वरून सुरु असलेल्या ट्विटर वॉरमध्ये आता भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने उडी घेत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्याने के एल राहुलची पाठराखणसुद्धा केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दोन दिवसांपूर्वी व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा हे यांच्यात के एल राहुल वरून ट्विटर वॉर रंगले होते. व्यंकटेश प्रसादने केएल राहुलला संघातून बाहेर काढत शुभमन गिलला संघात स्थान देण्याची मागणी केली होती. तर समालोचक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्राने केएल राहुलला अजून संधी मिळावी असे बोलून त्याची पाठराखण केली आहे. या वादात आता हरभजन सिंह याने उडी घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
https://twitter.com/harbhajan_singh/status/1628055859661266944
काय म्हणाले हरभजन सिंह?
हरभजन सिंहने “आपण केएल राहुलला (Harbhajan Singh) थोडा काळ एकटं सोडू शकतो का? त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तो अजूनही अव्वल खेळाडू आहे. तो जोरदार पुनरागमन करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सर्वजण अशा पॅचमधून जातो. तो पहिला आणि शेवटचा नाही. त्यामुळे कृपया तो आपला भारतीय खेळाडू आहे या वस्तुस्थितीचा आदर करा आणि विश्वास ठेवा” असे ट्विट करत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Harbhajan Singh | harbhajan singh indian cricketer tweet on support of klrahul
हे देखील वाचा :