पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Har Har Mahadev | बहुचर्चित ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे सांगून संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये शो बंद पाडला. त्यामुळे आता चांगलाच वाद सुरू झालाय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कालच संभाजीराजे छत्रपती यांनी दिवाळीत प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ तसेच आगामी काळात प्रदर्शित होणार्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरून संताप व्यक्त केला. या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड होत आहे. शिवरायांच्या इतिहासाचा विपर्यास करण्यात येत आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
त्यांच्या आक्षेपानंतर सोमवारी दुपारी एक वाजता संभाजी ब्रिगेडने पिंपरीतील विशाल थिएटरमध्ये घुसून घोषणाबाजी करत ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खोटा इतिहास दाखवणारा ‘हर हर महादेव’ चित्रपट तात्काळ बंद करा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने
बंद पाडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला. सध्या सोशल मीडियावरही या दोन्ही चित्रपटांवरून वाद सुरू असल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Har Har Mahadev | har har mahadev marathi movie show try to stop by sambhaji brigade in pimpri chinchwad pune
हे देखील वाचा :
Aditya Thackeray On Eknath Shinde Govt | ‘गद्दारांचं सरकार कोसळणार’; आदित्य ठाकरेंचे विधान
Basavwadi Social Foundation | निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमाला संपन्न