नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झोमॅटोचे ट्विटरवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलल्यानंतर इंटरनेटवर चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा प्रोफाइल फोटो व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधून स्क्रीनशॉट करून घेतला आहे. यात कंपनीने लिहिले आहे की, ‘आता हे अकाउंट ‘हॅपी रायडर’साठी फॅन अकाउंट म्हणून काम करेल.’
आता हा ‘हॅपी रायडर’ कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा कंपनीचा डिलिव्हरी बॉय असून त्याचे नाव सोनू असे सांगितले जात आहे. सोबतच सोशल मीडियावर सोनूचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सर्वप्रथम टिकटॉकच्या danishansari81 अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता.
https://twitter.com/ZomatoIN/status/1233313204039639041
हृदय जिंकणारे सोनूचे हास्य
या व्हिडिओमध्ये डिलीव्हरी बॉयचा पॉजिटीव्ह अंदाज दिसून येत असून त्याच्या स्माईलने सगळ्यांना वेडे केले आहे. तसेच त्याच्या सुंदरतेची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. तो व्हिडिओत दानिशच्या काही प्रश्नांचे उत्तर देत आहे.
जेव्हा दानिशने त्याला त्याच्या कमाईबाबत विचारले तेव्हा त्याने १२ तास काम करत असल्याचे सांगितले. आणि त्यासाठी त्याला इन्सेन्टिव्ह मिळून ३५० रु. मिळतात, असेही सांगितले. त्यानंतर त्याला खाण्याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की, जी ऑर्डर रद्द होते ती त्याची होऊन जाते. कंपनीपासून कोणतीही अडचण नाही. कंपनी पैसे आणि खाणे दोनही वेळेवर देते, असे त्याने पुढे सांगितले.