बहुजननामा ऑनलाईन टीम : (IND Vs AUS ) ऑस्ट्रेलिया दौर्यावर टीम इंडियाचे खेळाडू जखमी होण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचा हिरो बनलेला हनुमा विहारी ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जाणार्या शेवटच्या टेस्टमधून बाहेर गेला आहे. हनुमा विहारीची हॅमस्ट्रिंग इंज्युरी खुपच गंभीर आहे आणि पुढील महिन्यात इंग्लंडच्या विरूद्ध होणार्या टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा त्याचे खेळणे शक्य दिसत नाही.
हनुमा विहारी मॅचच्या शेवटी दिवशी फलंदाजी करता असताना त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली. मात्र, तरीही विहारीने कमाल केली आणि दुखापत झालेली असतानाही मॅचमध्ये सुमारे 45 ओवर फलंदाजी केली. विहारीच्या या फलंदाजीमुळे टीम इंडिया सिडनी टेस्ट ड्रॉ करू शकली.
रिपोर्टनुसार, विहारीने 15 जानेवारीपासून खेळल्या जाणार्या ब्रिस्बेन टेस्टमधून बाहेर गेला आहे, शिवाय इंग्लंडविरूद्ध पुढील महिन्यात होणार्या चार टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये सुद्धा त्याचे खेळणे शक्य दिसत नाही. हनुमा विहारीला पूर्णपणे बरे होण्यास किती काळ लागेल याबबात माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जडेजा सुद्धा बाहेर
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा सुद्धा ब्रिस्बेन टेस्टमधून बाहेर पडला आहे. रवींद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फलंदाजी दरम्यान फ्रॅक्चर झाले होते. रवींद्र जडेजाचे इंग्लंडविरूद्धच्या टेस्टमध्ये खेळणे शक्य नाही. जडेजाला पूर्णपणे बरे होण्यास 6 आठवड्यांचा वेळ लागू शकतो.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर यापूर्वी टीम इंडियाचे आणखी तीन खेळाडू मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल सुद्धा जखमी झाले आहेत. या तिनही खेळाडूंना गंभीर दुखापत झाली आहे आणि ते सुद्धा इंग्लंडच्या विरूद्ध पुढील महिन्यात होणार्या सीरीजमध्ये खेळतील असे वाटत नाही. ईशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाऊ शकला नव्हता.