नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 21 राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग कर्नल ऑफिसर आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह पाच जण शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लिहले आहे की, हंदवाडा येथे शहीद झालेल्या आमच्या शूर सैनिक आणि सुरक्षा जवानांना श्रद्धांजली. त्यांचे शौर्य आणि त्याग कधीही विसरणार नाही. त्यांनी अत्यंत समर्पणाने देशाची सेवा केली आहे आणि आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
Tributes to our courageous soldiers & security personnel martyred in #Handwara. Their valour & sacrifice will never be forgotten. They served the nation with utmost dedication & worked tirelessly to protect our citizens. Condolences to their families & friends: PM Narendra Modi pic.twitter.com/GRQIeWtHfO
— ANI (@ANI) May 3, 2020
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहले आहे, हंदवाडा मध्ये सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी शहीद होणे दु:खद आणि त्रासदायक आहे. आपल्या सर्व जवानांनी दहशतवाद्यांसोबत लढताना अदम्य धैर्य दाखवले आहे. त्यांचा हा त्याग आणि धैर्य कधीही विसरू शकत नाही. त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये लिहले की, हंदवाडा येथील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई दरम्यान शहीद झालेल्या सैनिक आणि सुरक्षा जवानांना मी श्रद्धांजली वाहतो. माझा संवेदना शहीदांच्या कुटूंबासोबत आहेत. भारत या शहीद हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसमवेत खाद्याला खांदा लावून उभा आहे.
Inspector-General of Police Kashmir, Sector Comdr, Deputy Inspector General North Kashmir & Superintendent of Police Handwara paid tribute to our heroes at Langate #Handwara: Kashmir Zone Police pic.twitter.com/lkkJuSlFwO
— ANI (@ANI) May 3, 2020
कोरोना साथीच्या विरोधात लढत असतानाही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा सुरु आहे. परंतु रविवारी सकाळी हंदवाडाच्या राजवार भागात चकमकीदरम्यान पाच सुरक्षा कर्मचारी शहीद झाल्याचे समजताच वातावरण गरम झाले.
The loss of our soldiers and security personnel in Handwara(J&K) is deeply disturbing and painful. They showed exemplary courage in their fight against the terrorists and made supreme sacrifice while serving the country. We will never forget their bravery and sacrifice.
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 3, 2020
शहीद सुरक्षा जवानांमध्ये 21 राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नाईक राकेश, लान्स नाईक दिनेश यांच्यासह जम्मू काश्मीर पोलिसांमधील उप निरिक्षक शकील काझी शहीद झाले. मात्र, सुरक्षा जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. मृत्यूमुखी पडलेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए- तैयबाचे होते.
The loss of our soldiers and security personnel in Handwara(J&K) is deeply disturbing and painful. They showed exemplary courage in their fight against the terrorists and made supreme sacrifice while serving the country. We will never forget their bravery and sacrifice.
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 3, 2020
कर्नल आशुतोष शर्मा यांना दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे पाच जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जाणांची टीमने इथं प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. दरम्यान, इथ लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील उप निरीक्षक असे पाच जण शहीद झाले.
एनपी न्यूज24 नेटवर्क