नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ओसामा बिन लादेन याचा अमेरिकेने काही वर्षापूर्वी खात्मा केल्यानंतर आता त्याचा मुलगा हमजा बिन लादेन यांचा देखील खात्मा केला. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी यासंबंधित ट्विट करत माहिती दिली. ट्विटमध्ये ते म्हणाले की अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेलनचा वारसदार हमजा बिन लादेन याला अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डवर दहशतवादी विरोधी करवाईअंतर्गत मारण्यात आले.
ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस द्वारे ही माहिती दिली, हमजा बिन लादेनच्या मृत्यूच्या बातमीने ना की फक्त अल कायदावर घाला घालता तर त्याने अल कायद्याचे कारवायावर देखील परिणाम झाला आहे. ट्रम्प यांनी हे सांगितले नाही की हमजाचा खात्मा कुठे आणि कसा झाला. हमजाचे शेवटचे वक्तव्य 2018 साली मीडिया समोर आले होते.
US President Donald Trump confirms death of Al-Qaeda heir Hamza bin Laden: AFP News Agency pic.twitter.com/ueoKftwHq9
— ANI (@ANI) September 14, 2019
त्या संदेशात हमजाने सौदी अरबला धमकी दिली होती आणि अरबमधील लोकांना विद्रोह करण्यास देखील सांगितले होते. सौदी अरबने या वर्षाच्या मार्च मध्ये त्याचे नागरिकत्व काढून घेतले होते. अमेरिकी मीडियाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देखील सांगितले होते की दोन वर्ष चाललेल्या ऑपरेशनमध्ये हमजा बिन लादेनचा मृत्यू झाला होता. परंतू डोनाल्ड ट्रम्प यांनी याला स्विकारले नव्हते. अमेरिकेच्या डिफेंस सेक्रेटरी मार्क एस्परने मागील महिन्यात हमजाच्या मृत्यूचा दावा केला होता.
हमजा ओसामा बिन लादेनचा मुलगा –
ओसामा बिन लादेनला 20 मुले होती त्यातील 15 वा आणि तिसऱ्या पत्नीचा मुलागा हमजा लादेन आहे आणि त्याचे वय 30 वर्ष होते. अल कायद्यामध्ये एका नेत्याच्या स्वरुपात तो पुढे येत होता. हमजावर फेब्रुवारीच्या 2019 मध्ये परराष्ट्र विभागाने एक मिलियन डॉलरची घोषणा केली होती.
समोर आला होता ऑडिओ व्हिडिओ –
विभागाच्या मते अनेकदा क्राऊन प्रिंस ऑफ जिहाद ची उपाधी त्याला देण्यात आली होती त्यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने अमेरिका आणि इतर देशांना हल्ल्याची धमकी देत आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीची धमकी देणारा व्हिडिओ समोर आला होता. हमजा अल कायद्याला एक नवी पिढी आकर्षित करत होता.2011 ला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर इस्लामिक स्टेट समूह आणि उदयानंतर अल कायदाने तरुण जिहादींमध्ये आपली प्रसिद्धी हरवली होती. असे असले तरी ते अयमान अल जवाहिरीचे नेतृत्वामध्ये मोठ्या गुप्त पद्धतीने पुन्हा आपले पाय रोवत आहे.