नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन आणि टॅबलेट्सचे प्रमाण वाढले असून मोबईल घेणे हे खूपच सोपे झाले आहे. ब्रिटनमध्ये ४ ते १० वर्षाच्या ५० टक्के मुलांकडे आपला स्वतःचा स्मार्टफोन असून आता स्मार्टफोन असलेल्या ९ ते १० वर्ष असलेल्या मुलांची संख्याही २०१९ मध्ये दुप्पट झाली आहे. मीडिया रेग्युलेटर ऑफकॉम ने ‘द एज ऑफ डिजिटल इंडिपेंडेंस’च्या एका वार्षिक अहवालात ही माहिती समोर आली आहे.
तसेच या अहवालात तीन ते चार वर्षांच्या मुलांकडे आपला स्वतःचा टॅबलेट असून यात १५ टक्के मुलांकडे स्वतःचे गॅझेट असून ते त्यांना २४ तास ठेवण्याची परवानगी आहे. या संस्थेने त्यांच्या २०१९ संशोधनात मुलांची सोशल सवय आणि इतर गॅझेटचा वापर मुलं कसा करतात, हे सांगितले आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार मोबाईल फोनला मुलांची पहिली पसंती असून सध्याच्या लहान मुलांना विना इंटरनेटचे जग माहित होत नाही, असे काही पालकांचे म्हणणे आहे. तर १० वर्षांपेक्षा मोठी असलेली मुले सोशल मीडियाचा वापर करत असून सामाजिक कारणे आणि संस्थेप्रति ते नेहमी ऍक्टिव्ह असतात.
सामाजिक स्तरावर ते पाठिंबा देत विरोधही करतात. तसेच १८ टक्के मुले ही कोणत्या तरी पोस्टला शेअर किंवा कमेंट करत असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच या रिपोर्टनुसार १७ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गचीही यात भूमिका आहे. तर ४५ लोकांच्या मते लहान मुलांनी इंटरनेटचा वापर करणे धोकादायक असले तरी ते फायद्याचेही आहे. काही मुलांना वाईट व्हिडिओ पाहण्याची सवय लागल्याने त्यांचे नुकसान होत असल्याचेही काहीं म्हणणे आहे. तर ६२ टक्के मुलांना व्हॉट्सऍप पाहायला आवडते. ५ वर्षे ते १५ वर्षातील ४८ टक्के मुली आणि ७१ टक्के मुले ऑनलाइन गेम खेळत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.