Hadapsar Pune Crime News | भेटायला बोलावून जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणाला लुबाडले ! हडपसर रेल्वे स्टेशनजवळील घटना, Grindr Social Networking App वर झाली होती ओळख

February 4, 2025

पुणे : Hadapsar Pune Crime News | तृतीयपंथीयांच्या गाइंडर (Grindr Social Networking App) या सोशल नेटवर्किंगवर झालेल्या ओळखीतून भेटायला बोलावून जीवे मरण्याची धमकी देऊन दोघांनी गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीन चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोडवरील डीएसके विश्व परिसरात काही अल्पवयीन मुले अशाच प्रकारे लोकांची लुटमार करीत असल्याचा प्रकार गेल्याच आठवड्यात उघडकीस आला होता. त्यानंतर आता हडपसर रेल्वे स्टेशनजवळ असाच प्रकार घडला आहे. (Robbery Case)

याबाबत वैदवाडी येथे राहणार्‍या एका २४ वर्षाच्या मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसर रेल्वे स्टेशनजवळील लक्ष्मी लॉन्सचे समोर मुंढवा येथील मोकळ्या जागेत २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राइंडर या सोशल नेटवर्किंग साईटवर फिर्यादी यांची बापू नावाच्या तरुणाबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्याने तुला भेटायचे आहे,असे सांगून भेटायला बोलावले. मुंढवा येथील मोकळ्या जागेत ते बापू याला भेटायला गेले होते. त्यावेळी दोघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या तरुणाने आपली बदनामी होईल, म्हणून ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. शेवटी त्याने धीर करुन पोलिसांकडे जाऊन याची माहिती दिली.

सिंहगड रोड परिसरात अशा प्रकारे काही तरुण तृतीयपंथीयांशी ओळख करुन त्यांना डी एस के विश्व येथे बोलवत. त्यांना आडबाजूला नेऊन त्यांच्याकडील रोकड लुटत. तसेच गुगल पे वरुन पैसे ट्रान्सफर करुन घेत असत. बदनामी होईल म्हणून कोणी तक्रार करत नसत. त्यामुळे चोरट्याचे फावत होते. सोशल मीडियावर याबाबत मेसेज व्हायरल झाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी या टोळीला पकडले होते. तसाच हा प्रकार असल्याचे संशय आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर व्ही महानोर (API R V Manohar) करीत आहेत.