Hadapsar Pune Crime News | पुणे: पती-पत्नीमधील एकांतपणाचे काढलेले व्हिडिओ जावयाने सासुला पाठवले

पुणे : Hadapsar Pune Crime News | पतीपत्नीमधील एकांतपणाचे काढलेले व्हिडिओ जावयाने आपल्या सासुला पाठवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच आपल्या पत्नीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Molestation Case)
याप्रकरणी २२ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध (वय २६) आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ व २५ सप्टेंबर दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर पतीबरोबर काही दिवस चांगले गेले.
त्यानंतर पतीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात करुन त्रास देऊ लागले. माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरुन मारहाण करुन वाईट वागणूक देऊ लागला. भांडणे करुन त्यांच्या मुळ गावी निघून गेला. त्यानंतर त्याने फिर्यादी व त्यांच्या दोघांचे फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्राम आय डी तयार करुन घेतला. त्याद्वारे फिर्यादी व त्यांचे खासगी व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी व त्यांचे व्हिडिओ फिर्यादीच्या आईच्या व्हॉटसअपवर पाठवून त्यांचा विनयभंग केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.
Comments are closed.