Hadapsar Pune Crime News | पुणे :पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाचे मोबाईल, लॅपटॉप लंपास, हडपसर परिसरातील घटना

June 20, 2024

पुणे : – Hadapsar Pune Crime News | पुणे शहरातील विविध भागात दरवाजा उघडा असणाऱ्या घरांमध्ये शिरुन मोबाईल (Mobile Theft), लॅपटॉप चोरीच्या घटना वाढत आहेत (Laptop Theft). हडपसर परिसरात एका पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या खोलीमधून चोरट्यांनी मोबाईल, लॅपटॉप व इतर वस्तू असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार बुधवारी (दि.19) मध्यरात्री दोन ते सकाळी पावणे आठ दरम्यान न्यु नवज्योती पीजी हडपसर (New Navjyoti Pg in Hadapsar) येथे घडला आहे.

याप्रकरणी नमन सुशिलकुमार साहू (वय-25 रा. न्यु नवज्योती पीजी, तुपे पाटील रोड, हडपसर मुळ रा. मिरापुर, अलहाबाद, उत्तर प्रदेश) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 380 अन्वये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नमन साहू, त्यांचे मित्र अशुतोष कुमार, ऋतीक राजकुमार, राजेंद्र चौहान, शशांक श्रीवास्तव हे न्यु नवज्योती पीजीमध्ये राहतात. बुधवारी मध्यरात्री रूम मध्ये झोपले होते. सकाळी उठल्यानंतर पाहिले असता खोलीचा दरवाजा उघडा दिसला. चोरट्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांचे मोबाईल, लॅपटॉप चोरून नेले. चोरी झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांनी 3 लॅपटॉप व 4 मोबाईल असा एकूण 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.