Hadapsar Pune Crime News | पुणे: जबदस्तीने तरुणीच्या घरात घुसून अश्लील वर्तन, तरुणावर गुन्हा दाखल

July 16, 2024

पुणे : – Hadapsar Pune Crime News | तरुणीने मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर तिचा वारंवार पाठलाग केला. तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या घरात जबदस्तीने घसून तिच्यासोबत अश्लील कृत्य करुन तिला बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार डिसेंबर 2022 ते 12 जुलै 2024 या कालावधीत वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पिडीत तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन आसमानराव गायके Sudarshan Aasmanrao Gayke (वय-25 रा. ऑरबीट शाळेजवळ, आनंदनगर, मुंढवा) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 78, 351, 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी हडपसर येथील मॉलमध्ये कामाला होती. तिने आरोपीला त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला होता. तरी देखील त्याने मुलीचा हात पकडून तिला मिठी मारुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पिडीत मुलीचा पाठलाग करुन काम करत असलेल्या ठिकाणी येऊन त्रास दिला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने मॉलमधील काम सोडून दुसरीकडे काम करु लागली. तरी देखील सुदर्शन याने मुलीचा पाठलाग करुन ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्रास दिला. तसेच तिच्या घरात जबरदस्तीने येऊन तिला अश्लील शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.