Hadapsar Pune Crime News | पुणे: ‘तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ म्हणत 25 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग; 52 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

पुणे : – Hadapsar Pune Crime News | ‘तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ असे बोलून सोबत काम करणाऱ्या तरुणीसोबत असभ्य वर्तन करुन तिचा विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 52 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते 25 जून या कालावधीत घडला आहे.
याबाबत 25 वर्षाच्या पीडित मुलीने मंगळवारी (दि.25) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल सुदाम माने Anil Sudam Mane (वय-52 रा. शेवाळवाडी मांजरी, हडपसर) याच्या विरोधात आयपीसी 354, 354(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हडपसर परिसरात एका ऑफिसमध्ये काम करतात. अनिल माने याने तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन ‘तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ असे बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यानंतर तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. तरुणीने अनिल माने याला फोन करु नको असे सांगितले. मात्र, त्याने वारंवार फोन केले. तसेच तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केला. आरोपीने पाठलाग करुन त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पत्नीला अॅसिड टाकण्याची धमकी
कोंढवा : लग्नात मानपान केला नसल्याच्या कारणावरून पत्नी सोबत वाद घातले. तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच मुल हवे असेल तर माहेरवरुन दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी मानसिक व शारिरिक छळ केला. पैसे आणले नाही तर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासु आणि नणंद यांच्यावर आयपीसी 498(अ), 377, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.