Hadapsar Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! विवाहबाह्य संबंध ठेवून विवाहितेचा छळ, पतीला अटक, प्रेयसीवर गुन्हा दाखल
पुणे : Hadapsar Pune Crime News | विवाहबाह्य संबंध ठेवून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला़ या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली.
रुक्मिणी ऊर्फ सोनु सिद्धेश्वर कवडगावे (वय ३४, रा. फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडिल व्यंकट यशवंतराव सावळे (वय ६६, रा. देशमुखनगर, लातुर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सिद्धेश्वर सुभाष कवडगावे (वय ३५, रा. कोमल प्लाझा, फुरसुंगी) याला अटक केली असून त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मिणी व सिद्धेश्वर कवडगावे यांचा विवाह २०११ मध्ये करण्यात आला होता. लग्नामधील हुंड्याच्या किरकोळ कारणावरुन सिद्धेश्वर नेहमी भांडण करुन शिवीगाळ करत मारहाण करुन मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्याचे पुजा नावाच्या तरुणीबरोबर विवाहबाह्य संबंध होते. त्यावरुन तो रुक्मिणीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करीत होता. या छळाला कंटाळून ३ ऑगस्ट रोजी पहाटे रुक्मिणी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी पावणेसात वाजता उघडकीस आला़ सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
Comments are closed.